घरताज्या घडामोडीटाटाच्या 'या' प्रसिद्ध इलेक्ट्रीक कारने घेतला पेट; थोडक्यात बचावला चालक

टाटाच्या ‘या’ प्रसिद्ध इलेक्ट्रीक कारने घेतला पेट; थोडक्यात बचावला चालक

Subscribe

पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना पर्यायी म्हणून इलेक्ट्रीक गाड्या सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून या इलेक्ट्रीक गाड्यांना अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना पर्यायी म्हणून इलेक्ट्रीक गाड्या सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून या इलेक्ट्रीक गाड्यांना अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सुरूवातीला इलेक्ट्रीक स्कुटरने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर चार चाकी इलेक्ट्रीक गाडीनेही पेट घेतला आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक गाड्या नागरिकांनी सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. (tata nexon ev catches massive fire in vasai west video goes viral)

टाटाची (tata nexon) सर्वाधिक प्रसिद्ध असलेली SUV Tata Nexon या इलेक्ट्रिक कारला आग लागली आहे. मुंबईच्या वसई पश्चिम (पंचवटी हॉटेलजवळ) ही घटना घडली. इलेक्ट्रीक गाडीला आग लागल्याची घटना बुधवारी घडली. भारतात प्रथमच एका इलेक्ट्रीक कारला आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या सोशल मीडियावर या कारला आग लागल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेबद्दल कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

कारला आग लागल्याची पहिली घटना घडल्यानंतर, कंपनीने एक निवेदन जारी केले. दरम्यान, Tata Nexon EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. देशात दर महिन्याला किमान दोन ते तीन कारची विक्री होत आहे. कंपनीने आतापर्यंत तीस हजार या गाड्या विकल्या आहेत.

या कारच्या मालकाने त्याच्या नेक्सॉन ईव्ही गाडीला त्याच्या ऑफिसमध्ये नेहमीच्या स्लो चार्जरने चार्ज केले. घराच्या दिशेने जाताना सुमारे 5 किमी अंतर कापल्यानंतर कारमधून काही विचित्र आवाज ऐकू आले आणि डॅशबोर्डवर इशारा मिळाला. त्यानंतर त्याने वाहन थांबवले आणि कारमधून बाहेर पडला. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – वर्षा निवासस्थानावरील बैठकीत या आमदारांची उपस्थिती राहणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -