घरफिचर्सथोर समाजसेविका डॉ. हेलन केलर

थोर समाजसेविका डॉ. हेलन केलर

Subscribe

डॉ. हेलन अ‍ॅडम्स केलर या अमेरिकन लेखिका, समाजसेविका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्‍या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या .

त्यांचा जन्म २७ जून १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. त्यांच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एव्ही ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट अ‍ॅडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे ‘टस्कंबिया नॉर्थ अलबमियन’चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे कप्तान होते.

- Advertisement -

हेलन या जन्मजात मूकबधिर नव्हत्या. लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटिस) नंतर त्या अंध आणि बधिर झाल्या.

त्यांनी १८८८ मध्ये अंधांसांठीच्या पर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. १८९४ मध्ये त्यांनी आणि न सॅलिव्हन यांनी न्यू यॉर्कमधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. त्यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या.

- Advertisement -

त्यांनी १२ पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत. वयाच्या ११ वर्षी त्यांनी द फ्रॉस्ट किंग (१८८१) हे पुस्तक लिहिले.

१४ सप्टेंबर १९६४ रोजी राष्ट्रपती लिंडन बी. जॉन्सन यांनी केलर यांना अमेरिकेमधील सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम दिले. १९६५ मध्ये त्यांची नॅशनल वीमेन्स हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. केलर यांनी नंतरचे आयुष्य अमेरिकन फाऊंडेशन या अंध लोकांच्या संघटनेसाठी निधी जमवण्यात खर्ची घातले.

पुण्याच्या आडकर फाऊंडेशन आणि श्यामची आई फाऊंडेशन या संस्था अंधांकरिता काम करणार्‍या व्यक्तीला डॉ. हेलन केलर पुरस्कार देतात. अशा या थोर समाजसेविकेचे १ जून १९६८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -