घरटेक-वेकएलॉन मस्क यांनी 200 कर्मचाऱ्यांची एकाच वेळी केली हकालपट्टी, कारण काय तर...

एलॉन मस्क यांनी 200 कर्मचाऱ्यांची एकाच वेळी केली हकालपट्टी, कारण काय तर…

Subscribe

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीने मालक एलॉन मस्क यांच्या टेस्लासाठी गेली अनेक दिवस खूप अडचणीचे जात आहेत. मस्क एकीकडे भारतात व्यावसायिक प्रवेश करण्याची स्वप्न पाहत आहेत दुसरीकडे त्यांच्यावर एकामागोमाग इतर कार्यालये बंद करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत टेस्ला कंपनीने आका आपल्या ऑटोपायलट टीममधील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना एकात वेळी काढून टाकल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील टेस्लाचे एक कार्यालय नुकतेच बंद करण्यात आले, या कार्यालयातून जवळपास 200 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दरम्यान कंपनीने काढलेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांना तासावर पगार दिला जात होता. .

गेल्या आठवड्याप्रमाणे मस्क यांनी पगारदार कर्मचार्‍यांचे वेतन 10 टक्क्यांनी कपात करण्याची योजना आखली आहे, ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, टेस्लाकडून आता तासावर काम करणाऱ्या नोकऱ्या वाढवण्याचा विचार आहे. मस्क यांच्या घोषणेनंतर टेस्लाने पगारदार कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे टेस्लाचे एकूण कर्मचारी सुमारे 3.5 टक्क्यांनी कमी होतील. एका अहवालात असेही म्हटले आहे की, टेस्ला त्याच्या सेवांमध्ये 100,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते.

- Advertisement -

एलॉन मस्क यांनी टेस्ला कोरोना काळातील वर्क फ्रॉम होमवर पूर्णपणे बंदी आणली. मात्र आता एलॉन मस्क यांच्या या आदेशामुळे टेस्ला कंपनी अडचणीत सापडली आहे. याचे कारण टेस्लाच्या कार्यालयांमध्ये आता सध्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांनंतर काम करण्यासाठी सर्व सुविधा देऊ नाहीत. यात टेस्लाच्या फ्रेमोंट, कॅलिफोर्निया प्लांटमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेसे डेस्कही नव्हते. याशिवाय पार्किंग आणि वायफायची सुविधाही कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येसमोर अपुरे पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नीट कामही करता येत नव्हते. अशात 2019 पासून टेस्ला येथील कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या संख्येनुसार कार्यालयातील त्यांची आसनव्यवस्था, पार्किंग व इतर सुविधा वाढविण्याकडे लक्ष दिले गेले नाही. आता सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र कार्यालयात बोलावले असता, कार्यालये सर्व कर्मचाऱ्यांना हाताळण्यास तयार नसल्याचे समोर आले. या परिस्थितीमुळे आता टेस्लाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.


महाविकास आघाडी सरकारची ही शेवटची कॅबिनेट का? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले..

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -