घरमनोरंजनआलियाला सेटवर दुखापत; रणबीर घेतोय काळजी

आलियाला सेटवर दुखापत; रणबीर घेतोय काळजी

Subscribe

आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ब्रम्हास्त्र' चित्रपट, पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे.

आलिया भट्ट सध्या तिच्या ‘कलंक’ आणि ‘ब्रम्हास्त्र’ या दोन आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान आलियाच्या पायाल दुखापत झाली. दुखापतीनंतर आलिया रणबीर कपूरसोबत सेटवरुन बाहेर जाताना माध्यमांच्या कॅमेरांनी टिपलं आणि चर्चांना उधाण आलं. इतकंच नाही तर रणबीर आणि आलियाला जुहूच्या एका हॉस्पिटलमधूनही बाहेर पडत असतानाही स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे आलियाला मलमपट्टी करण्यासाठी रणबीरच तिला रुग्णालयात घेऊन गेल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलियाला सेटवरच दुखापत झाली. ही बातमी कळल्यानंतर रणबीर कपूर त्वरित सेटवर पोहचला आणि आलियाला तिथून घेऊन गेला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रणबीर आलिया भट्टला उपचारासाठी जुहूच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. या दोन्हीवेळी रणबीर आलियाची काळजी घेताना दिसला. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात आलिया भट्टसोबत रणबीर कपूरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर यांच्या अफेअरची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. अशातच आता हे नवं प्रकरण समोर आल्यामुळे बॉलीवूडमध्ये आणि या दोघांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगायला सुरुवात झाली असणार, हे नक्की.

 

View this post on Instagram

 

An injured #aliabhatt post doctor’s visit with #ranbirkapoor being around her #takecare #getwellsoon #instadaily @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

उशीरा रिलीज होणार ‘ब्रम्हास्त्र’

आयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी रिलीज होणार होता. मात्र, त्याचदिवशी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षयने नुकतीच ट्वीटरवरुन याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, अक्षय कुमार आणि करण जोहर चांगले मित्र असल्याने करणने त्याचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनसुार, आता ब्रम्हास्त्र चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार आहे.  सिनेमाच्या टीमकडून अद्याप प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणताच ठोस खुलासा करण्यात आलेला नाही. ब्रम्हास्त्र हा epic saga चित्रपट असून त्यामध्ये larger than life VFX चा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणाऱ्या अमिताभ, आलिया आणि रणबीरच्या त्रिकुटाला प्रेक्षक कशी पसंती देतात? हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -