घरमनोरंजनअक्षयमुळे करण जोहरने पुढे ढकलला 'ब्रम्हास्त्र'

अक्षयमुळे करण जोहरने पुढे ढकलला ‘ब्रम्हास्त्र’

Subscribe

अक्षयने आपल्या चित्रपटाची तारीख १५ ऑगस्ट जाहीर केल्यामुळे करण जोहरने ब्रम्हास्त्र ख्रिसमस २०१९ ला ढकलला

बॉलीवूड म्हणजे नेहमीच चित्रपटांची स्पर्धा. कोणाचा चित्रपट जास्त हिट जातो, कुणाचा सर्वाधिक चालतो आणि पैसे कमवतो, यावर सर्वांची नजर असते. एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट रिलीज झाले तर त्यामुळे कुणालाच फायदा होत नाही. परंतु बॉलीवूडमध्ये आपापसातील मैत्रीमुळे असे खूप कमी होताना आपल्याला दिसते. अक्षय कुमार आणि करण जोहर ‘केसरी’ या चित्रपटात एकत्र काम करत आहे. करण या चित्रपटाचा निर्माता आहे. नुकतेच अक्षयने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या नवीन चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. “मिशन मंगल” हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी रिलीज होणार, असे त्याने सांगितले.

- Advertisement -

पण करण जोहरचा ब्रम्हास्त्र हा सुध्दा २०१९ च्या स्वातंत्र्य दिवशीच प्रदर्शित होणार होता. ब्रम्हास्त्र हा epic saga असून त्यात larger than life VFX असणार आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन असून, या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. यामुळेच करणने अक्षयच्या चित्रपटाची तारीख पाहून लगेच ब्रम्हास्त्रची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. ट्विटरवर करणने ब्रम्हास्त्र आत्ता २०१९ च्या ख्रिसमसला रिलीज होणार असे सांगितले आहे.

- Advertisement -

करणच्या या निर्णयामुळे दोन्ही चित्रपटांना परस्पर फायदा झाला आहे. मिशन मंगल आणि ब्रम्हास्त्र हे दोन्ही खूप मोठ्या बजेटचे चित्रपट आहेत. त्यामुळे करणने खरच खूप चांगला आणि फायदेशीर निर्णय घेतला आहे. करणने हे कृत्य करून नक्कीच सद्भावना दर्शविली आहे. तो अक्षयसोबत पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ या चित्रपटानिमित्त काम करणार आहे. याची शूटिंग जानेवारी २०१९ मध्ये सुरू होईल.

मिशन मंगल हा पॅडमॅन डायरेक्टर आर बाल्की यांच्या सहकार्याने आणि जगन शक्ती दिग्दर्शित करणार आहेत. याचे चित्रीकरण या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -