घरमहाराष्ट्रपुणे रेल्वे स्टेशनवर वरिष्ठ पोलीस निरिक्षकावर गोळीबार

पुणे रेल्वे स्टेशनवर वरिष्ठ पोलीस निरिक्षकावर गोळीबार

Subscribe

पुण्यातील चंदननगरमध्ये आज काळी झालेल्या हत्याप्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. चंदननगर हत्याप्रकरणातील आरोपींनीच हा गोळीबार केला असल्याचा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुण्यामध्ये एकाच दिवशी गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. आज दुपारी पुणे रेल्वे स्टेशनवर क्राईम ब्रांचच्या पोलीस निरिक्षकावर गोळीबार करण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ही घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये पोलीस निरिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करुन हल्लेखोर फरार झाले आहेत. जखमी जालेल्या पोलीस निरिक्षकाला ताबडतोब रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्याचे पोलीस उपाआयुक्त शिरिष सरदेशपांडे यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

आज पुण्यामध्ये गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी गजानन पवार यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. या गोळीबारात गजानन पवार गंभीर जखमी झाले त्यांच्या पोटाला गोळी लागली आहे. गजानन पवार हे क्राईम ब्रँचच्या युनिट २ मध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या नागरिकांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवले. रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

पुण्यात गोळीबाराची तिसरी घटना

पुण्यातील चंदननगरमध्ये आज काळी झालेल्या हत्याप्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. चंदननगर हत्याप्रकरणातील आरोपींनीच हा गोळीबार केला असल्याचा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंदननगर येथे मेसचालक महिलेची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुण्याच्या कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चार दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ज्वेलर्सच्या एका कामगारावर गोळी झाडली असता तो गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -