घरट्रेंडिंगपरिसरातील समस्या सांगितल्याने आमदार संतापला; रागात नागरिकाच्या डोक्यात घातली वीट

परिसरातील समस्या सांगितल्याने आमदार संतापला; रागात नागरिकाच्या डोक्यात घातली वीट

Subscribe

मतदारसंघातील समस्या सांगितल्यामुळे एका आमदाराने थेट नागरिकाच्या डोक्यात वीट टाकल्याची धक्कादायक घटना दिल्लीत (Delhi) घडली. दिल्लीतील मॉडल टाऊन विधानसभा मतदारसंघातील (Model Town Assembly constituency) ही घटना आहे.

मतदारसंघातील समस्या सांगितल्यामुळे एका आमदाराने थेट नागरिकाच्या डोक्यात वीट टाकल्याची धक्कादायक घटना दिल्लीत (Delhi) घडली. दिल्लीतील मॉडल टाऊन विधानसभा मतदारसंघातील (Model Town Assembly constituency) ही घटना आहे. या मतदारसंघाचे आम आदमी पार्टी पक्षाचे (aam aadmi party) आमदार अखिलेश पति त्रिपाठी (Akhilesh Pati Tripathi) यांनी एका गुड्डू हलवाई या नागरिकांच्या डोक्यात वीट टाकल्याचे समजते. याप्रकरणी आमदार अखिलेश पति त्रिपाठी याच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सपास सुरु आहे. (aam aadmi party mla akhilesh pati tripathi beat a man due to complaint regarding sewage at delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अखिलेश पति त्रिपाठी यांनी मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप गुड्डू हलवाई याने केला. पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती टेक्सट मेसेजद्वारे मिळाल्याचे समजते. सदर घटनेची माहिती बुधवारी ६ जुलै रोजी ४:३० वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुड्डू हलवाई आणि मुकेश बाबू याची भेट घेतली. त्यानंतर उपचारासाठी या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

पोलिसांनी तक्रारीनुसार, अखिलेश पति त्रिपाठी यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आमदार अखिलेश पति त्रिपाठी यांच्या पत्नी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “गुड्डू यांच्यावर कोणत्याच प्रकारे हल्ला करण्यात आलेला नाही. हा सर्व राजकीय स्टंट आहे”, असे त्यांच्या पत्नीने सांगितले.

गुड्डू हलवाई याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आमदार त्रिपाठींना यांची भेट घेतली. त्यांना गटाराबाबतची समस्या सांगितली. त्यानंतर आमदार संतापले आणि त्यांनी मला विटेचा तुकडा फेकून मारला. हा सर्व प्रकार पाहून माझा मित्र महेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझ्यासोबत तोही जखमी झाला, असे त्याने सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, २९ मे रोजी आमदार राजेंद्र राऊत यांनी एका कार्यकर्त्याला श्रीमुखात भडकावली होती. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान हा कार्यकर्ता स्टेजवर आमदार राऊत यांच्या पाया पडला. पाया पडल्यानंतर वर मान करताच राऊत यांनी मुस्काटात लावून दिली होती.


हेही वाचा – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार, कोणाला कोणती खाती मिळणार?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -