घरलाईफस्टाईलReceipe : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ आलाय? मग या वेळी 'उपवासाचा ढोकळा'...

Receipe : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ आलाय? मग या वेळी ‘उपवासाचा ढोकळा’ नक्की ट्राय करा

Subscribe

अनेकदा उपासाला काय करावे असा बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडत असतो. त्यातच सातत्याने साबुदाणा खिचडी, वडा हे पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही उपवासाचा ढोकळा नक्की ट्राय करा

उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

- Advertisement -
  • 1/2 वाटी दही
  • 1-2 हिरव्या मिरचीची पेस्ट
  • 1 वाटी शिंगाड्याचे पीठ
  • 1/4 वाटी भगरीचे पीठ
  • 2 चमचे इनो
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट गरजेनुसार,
  • ओलं खोबरं
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

  • सर्वप्रथम एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पीठ, मिरचीची पेस्ट, दही आणि मीठ या सगळया गोष्टी एकत्र करुन १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून दया.
  • १० मिनिट झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल आणि इनो घालुन हे मिश्रण एकजिव करुन घ्या.
  • त्यानंतर त्यात ढोकळ्याच्या साच्याला थोडं तेल लावून त्यात हे सर्व तयार मिश्रण घाला आणि त्यावर वरुन थोडेसे लाल तिखट टाका. आणि ढोकळयाचा भांड्याला स्टीमरमध्ये ठेवून दया.
  • आता हे ढोकळयाचे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे स्टीमर वाफवून घ्या.
  • साधारण १५ मिनिटांनी त्यात चाकु किंवा चमचाचं टोक बुडवून बघा. त्यावरुन तुम्हाला कळेल की ढोकळा निट शिजला की नाही.
  • ढोकळा निट शिजून तयार झाला असेल तर साचा स्टीमर मधून बाहेर काढून घ्या.
  • साचा थंड झाला की ढोकळा त्यातून बाहेर काढून त्याचे बारीक काप चिरा.
  • आता त्यावर ओलं खोबरं , मिरची आणि जीऱ्याचा तडका देऊन, उपवासाचा ढोकळा सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : पौष्टिक आणि खमंग कच्च्या केळाची टिक्की नक्की ट्राय करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -