घरताज्या घडामोडीआषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू

Subscribe

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव फाटा येथे हा अपघात झाला.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव फाटा येथे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतल. त्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Accident at Pandharpur Two dead and three injured)

राजू संभाजी शिधोळकर (४५) आणि परशुराम संभाजी जवरूचे (५०) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तसेच, अभिजीत हुंबरे (२८), गीतेश पोकंशेकर (२६) आणि राजकवि कृष्णा मधुकर (२३) हे गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव तालुक्यातील अंनगुळ गावात राहणारे हे रहिवाशी आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगावमधील अंनगुळ येथील ५ जण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. सेल्टोस या गाडीने ही पंढरपूरकडे येत असताना रविवारी पहाटे त्यांच्या गाडीला अपघात झाल. या अपघातानंतर मयत भाविकांबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहेत. तसेच जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -