रेल्वेच्या ‘या’ स्थानकांची होणार सुधारणा; पावसाळ्यानंतर कामकाजाला सुरुवात

रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच विविध सुविधा उपलब्ध करून देत असते. प्रवाशांची (Railway Passengers) गैरसोय होऊ नये यासाठी अनेक प्रकल्प प्रवाशांसाठी आणले जातात. अशातच मागील काही महिन्यांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Central Railway fines 24,944 persons for violating Kovid rules; Record recovery of Rs 123.31 crore

रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच विविध सुविधा उपलब्ध करून देत असते. प्रवाशांची (Railway Passengers) गैरसोय होऊ नये यासाठी अनेक प्रकल्प प्रवाशांसाठी आणले जातात. अशातच मागील काही महिन्यांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकात गैससोय होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी केली जात आहे. त्यानुसार, आता मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील (MUTP) स्थानक सुधारणा प्रकल्पांतर्गत आठ उपनगरीय रेल्वे स्थानकांची सुधारणा केली जाणार आहे. यासाठी कामासाठी लागणाऱ्या ५३४ कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चासाठी खासगी कंत्राटदारांनी तयारी दर्शवली आहे.

दोन महिन्यांत कंत्राटदार नियुक्त

मुंबई सेंट्रल, सांताक्रूझ, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, कसारा, कांदिवली, मिरा रोड या आठ स्थानकांसाठी चार कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. या रेल्वे स्थानकांची सुधारणा करण्यासाठी येत्या दोन महिन्यांत कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच, पावसाळा संपल्यावर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी एमयूटीपी-३ अ प्रकल्पात १८ स्थानक सुधारणेचा समावेश करण्यात आला आहे. (Mumbai railway 8 railway station will develop)

बोरिवली स्थानकाच्या धर्तीवर स्थानक सुधारणांचे काम

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) बोरिवली स्थानकाच्या (Borivali Station) धर्तीवर स्थानक सुधारणांचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार या आठ स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर डेक उभारून प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देणे, डेकला सर्व पुलांची जोडणी देणे, एका पुलावरून स्थानकातील कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उतरता यावे, गर्दीच्या जागांचे व्यवस्थापन करणे, प्रवासी सुविधा उभारणे यांचा स्थानक सुधारणा कामात समावेश आहे.

१८ स्थानकांसाठी ७ गटांत निविदा

दरम्यान, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील १८ स्थानकांसाठी ७ गटांत निविदा मागवण्यात आल्या होत्या. यापैकी ४ गटांतील ८ स्थानकांतील सुधारणेसाठी खासगी कंत्राटदारांनी तयारी दर्शवली आहे. एप्रिलमध्ये मागविण्यात आलेल्या निविदेअंती स्थानकांच्या सुधारणेसाठी चार कंपन्या उत्सुक आहेत.

एका कंपनीला एकच स्थानक

नियमानुसार एका कंपनीला एकच स्थानक सुधारणेसाठी देण्यात येईल. आर्थिक छाननीअंती स्थानक सुधारणेचा प्रस्तावित खर्च मांडण्यात येईल. संबंधित स्थानकांची सामान्य व्यवस्था रेखाचित्र (जीएडी), सर्वेक्षण, संकल्पचित्र यांना मान्यता मिळविण्यात आलेली आहे.


हेही वाचा – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू