भारताचा 49 धावांनी इंग्लंडवर विजय, टी-20 मालिकेत 2-0 ची आघाडी

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारताने (India) 49 धावांनी इंग्लंडवर (England) विजय मिळवला आहे. सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारताने (India) 49 धावांनी इंग्लंडवर (England) विजय मिळवला आहे. सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचे गोलंदाज भुवनेश्वर, बुमराह, चहलने यांनी इंग्लंडच्या फंलदाजांसमोर चेंडूचा भेदक मारा केला. त्यामुळे फलंदाजांनी जास्त धावा करता आल्या नाही. त्यामुळे भारताने सामना जिंकला तसेच, या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. (India won second t 20 match against England)

भारत आणि इंग्लंड यांच्याच दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य ठेवले. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्याच बॉलवर भुवनेश्वरने जेसन रॉयला तंबूत धाडले. मग एका मागे एक इंग्लंडचे गडी बाद होत गेले, आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर सर्वबाद झाला.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना पदार्पण केलेल्या रिचर्ड ग्लीसनने रोहितला 31 धावांवर बाद केले. त्यानंतर पंत (26) आणि विराट कोहली (1) यांना एकाच षटकात ग्लीसननेच बाद केले. तसेच, इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडकडून फलंदाजी करताना मोईन अलीने 35 आणि डेविड विलीने 33 ही सर्वाधिक धावसंख्या केली. इतर खेळाडू खास कामगिरी करुच शकले नाहीत. भुवनेश्वरने सर्वाधिक 3 गडी यावेळी बाद केले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर पांड्या आणि पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडचा एक गडी धावचीत झाला. 3 षटकात 15 धावा देत 3 गडी बाद करणाऱ्या भुवनेश्वरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.


हेही वाचा – टी-20 मध्ये जलद 1000 धावा करणारा ‘हा’ ठरला पहिला भारतीय कर्णधार