घरताज्या घडामोडीइलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याच्या सरकारी योजनेबाबत गडकरींची मोठी घोषणा

इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याच्या सरकारी योजनेबाबत गडकरींची मोठी घोषणा

Subscribe

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक महामार्ग बनविण्याच्या सरकारी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्ली-मुंबई दरम्यान इलेक्ट्रीक महामार्ग बनविण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुडगाव येथे हायड्रॉलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दिल्ली आणि मुंबई दरम्यान इलेक्ट्रीक महामार्ग बनविण्याचा विचार करत असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. इलेक्ट्रीक महामार्गची योजना येथील प्रवाशांना उत्तम ठरू शकते. या महामार्गावर आपण ट्रॉलीबसप्रमाणेच ट्रॉली ट्रकही चालवू शकता. ट्रॉलीबस ही एक इलेक्ट्रिक बस आहे, जी ओव्हरहेड तारांपासून होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यावर चालते, असं गडकरी म्हणाले.

- Advertisement -

मंत्रालयाने सर्व जिल्हे चार पदरी रस्त्यांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकार २.५ लाख कोटी रूपयांचे बोगदेही तयार करत आहेत, अशी माहिती गडकरींनी दिली आहे. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्व सेवा डिजिटल करणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील गडकरींनी पुढील एक ते दोन वर्षांत इलेक्ट्रीक वाहनांची किंमत पेट्रोलवरील वाहनाच्या बरोबरीत येईल, असं गडकरींनी म्हटलं होतं.


हेही वाचा : ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -