घरठाणेमुसळधार! राज्यातील अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे इशारा

मुसळधार! राज्यातील अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे इशारा

Subscribe

मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. (Heavy rainfall red alert in maharashtra mumbai thane)

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे २ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आहे. तसेच, पावसाचा जोर कायम असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील २.३ तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट

- Advertisement -

मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे.

मुंबई लोकलसेवा सुरळीत

माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार बॅटिंग केली. पण सध्या मात्र पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत होती.

या नदीची इशारा पातळी पाच मीटर असून धोका पातळी सात मीटर इतकी आहे. पण सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण असं असलं तरी हवामान विभागांना दिलेला पावसाचा इशारा पाहता नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क आहे. सध्या जिल्ह्यामध्ये NDRF च्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -