घरमहाराष्ट्रनाशिकद्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ

द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ

Subscribe

नाशिक : देशाच्या इतिहासात प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून सर्वोच्चस्थानी विराजमान होणार असल्याने सर्वपक्षिय आदिवासी लोकप्रतिनिधी व समाजबांधवांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी वज्रमूठ केली आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयाचे राजकारणापलिकडे स्वागत करण्याचा निर्धार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये सर्वपक्षिय बैठक पार पडली. यावेळी माजी महापौर रंजना भानसी, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांसह नगरसेवक आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवार म्हणून आदिवासी समाजाच्या प्रतिनिधित्व करणार्‍या द्रौपदी मुमूर्र् यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी गटातर्फे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या सोमवारी (दि.18) देशाच्या सर्वोच्च पदासाठी मतदान होणार आहे. परंतु, मतांची आकडेवारी बघितली तर द्रौपदी मुमूर्र् यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आदिवासी समाजासाठी काम केलेली एक महिला प्रथमच राष्ट्रपती पदावर विराजमान होत असल्याने आदिवासी समाजासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व आदिवासी समाजाने स्वागत केले पाहिजे, अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी व्यक्त केली. द्रौपदी मुमूर्र् यांच्या रुपाने आदिवासी समाजाला न्याय मिळाल्याची भावना यावेळी आदिवासी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. हा निर्णय म्हणजे राजकारणापलिकडे सद्भावना व्यक्त करण्यासारखा असल्याने त्याचे स्वागतच व्हायला हवे, असे सांगितले. तर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुमूर्र् यांची निवड झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सव साजरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा : मंत्री डॉ.पवार

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रस्ते व पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः सुरगाणा तालुक्यातील अलंगुन व परिसरामध्ये पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्याने स्थानिक नागरीकांना दळणवळासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील नागरी जनजीवन व सुव्यवस्था बाधित होवु नये, याकरीता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी, पशुपालक व नागरिकांना तात्काळ मदत देण्याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे मागणी केली आहे. डॉ.भारती पवार या सध्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुमूर्र् यांच्या प्रचार दौर्‍यात सामील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -