घरमहाराष्ट्रपुढील चार दिवस समुद्राला उधाण; जाणून घ्या भरतीच्या तारीख व वेळा

पुढील चार दिवस समुद्राला उधाण; जाणून घ्या भरतीच्या तारीख व वेळा

Subscribe

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा त्रासाला सामोरे जावे लागते.

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा त्रासाला सामोरे जावे लागते. अशातच आजपासून (शुक्रवार) चार दिवस अरबी समुद्रात मोठी भरती येणार आहे. तब्बल ४.५१ ते ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Heavy Rainfall High Tide Strikes Mumbai Four Day)

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) दुपारी १:२२ मिनिटांनी जुलै महिन्यातील सर्वांत मोठी भरती सुरू होणार आहे. तसेच, साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात समुद्रावर फेरफटका मारण्यास न जाण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात समुद्रकिनारे फक्त सकाळी ६ ते १० या वेळेतच सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, समुद्रात येणाऱ्या भरतीवेळी ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. अग्निशमन दल व पर्जन्य जलवाहिन्या विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पातमुखांचे दरवाजे बंद केले जाणार

- Advertisement -

समुद्रालगत असलेल्या पातमुखांचे (आऊटफॉल) दरवाजे बंद केले जाणार आहे. परिणामी त्यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरण्यापासून अटकाव होणार आहे. त्यामुळे पावसाचे साठणारे पाणी हाजी अली, क्लिव्हलँड, इर्ला, ब्रिटानिया, गझदरबंद येथे बसवलेल्या पंपिंग स्टेशनद्वारे समुद्रात सोडण्यात येणार आहे.

पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क

  • पालिका प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना.
  • हिंदमाता, गांधी मार्केट, नॅशनल कॉलेज, मिलन सब-वे, अंधेरी सब-वे आदी ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना.
  • अग्निशमन दलाला सुरक्षा बोटी, लाइफगार्ड सज्ज ठेवण्याचे निर्देश.

भरतीच्या वेळापत्रक

तारीख              भरतीची वेळ               लाटांची उंची (मीटरमध्ये)

१५ जुलै             दुपारी १.२२                      ४.८७

१६ जुलै             दुपारी २.०८                      ४.८५

१७ जुलै             दुपारी २.५४                     ४.७३

१८ जुलै             दुपारी ३.३८                     ४.५१


हेही वाचा – शिंदे सरकार सुसाट! पहिल्‍याच कॅबिनेटमध्‍ये ७ निणर्यांचा धडाका,जनतेला दिलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -