घरदेश-विदेशराफेल करारावरून सिद्धू यांचा भाजपला टोला

राफेल करारावरून सिद्धू यांचा भाजपला टोला

Subscribe

'पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना दिलेली गळाभेट शेवटी कामी आली. जवळपास १६ कोटी लोकांसाठी दिलेली ही गळाभेट अमृतसरसारखी ठरली. माझी गळाभेट ही राफेल करारासारखी नाही हे आता किमान स्पष्ट तरी झाले'. अशा शब्दात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपला टोला हाणला आहे.

कर्तारपूर मार्ग खुला करत असल्याचं पाकिस्ताननं जाहिर केल्यानंतर माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजप सरकारला जोरदार टोला हाणला आहे. ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना दिलेली गळाभेट शेवटी कामी आली. जवळपास १६ कोटी लोकांसाठी दिलेली ही गळाभेट अमृतसरसारखी ठरली. माझी गळाभेट ही राफेल करारासारखी नाही हे आता किमान स्पष्ट तरी झाले’. अशा शब्दात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपला टोला हाणला आहे. पाकिस्ताननं गुरूवारी गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतिनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करत असल्याची घोषणा केली. भारताच्या यात्रेकरूंसाठी सोयीसाठी कर्तारपूर मार्गिका खुली करण्याची मागणी भारतानं केली होती. त्यानंतर पाकिस्ताननं ही मागणी मान्य देखील केली. त्यानंतर सिद्धू यांनी भाजप सरकारला टोला हाणला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. या भेटीवरून सिद्ध यांना टीकेचा धनी व्हाव लागलं होतं. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धूच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण, पाकिस्ताननं कर्तारपूर मार्ग भारतीय यात्रेकरूंसाठी खुला केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना दिलेली गळाभेट शेवटी कामी आली. जवळपास १६ कोटी लोकांसाठी दिलेली ही गळाभेट अमृतसरसारखी ठरली. माझी गळाभेट ही राफेल करारासारखी नाही हे आता किमान स्पष्ट तरी झाले असा टोला भाजपला लगावला आहे. यापूर्वी सिद्धू यांनी २०१४मधील मोदी लहर सर्वांसाठी जहर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त उद्योजकांच्या हातातील बाहुले झाले आहेत. २०१९ साली नरेंद्र मोदी यांची लहर संपुष्टात येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील असा दावा देखील केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धू यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे.

 वाचा – माझ्या पाकिस्तान जाण्याने भारत-पाक संबध मजबूत – सिद्धू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -