घरताज्या घडामोडीभारतीय रुपया सध्या इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत - शक्तिकांत दास

भारतीय रुपया सध्या इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत – शक्तिकांत दास

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे बोलले आहे. आज BOB Annual Banking Conference च्या वार्षिक बँकिंग परिषदेला संबोधित करताना, RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक परिस्थिती अत्यंत गंभीर असताना देखील भारतीय अर्थव्यवस्था त्या तुलनेने चांगल्या स्थितीत आहे.

भारतीय रुपया सध्या इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. रुपयांमध्ये तीव्र चढउतार होत असतात. पण अस्थिरता येऊ दिली जाणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारात यूएस डॉलरचा पुरवठा करत आहे. त्यामुळे रोखीचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित होतो. आरबीआयने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे रुपयांचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांना घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीनुसार पाहण्याची गरज आहे, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

- Advertisement -

रेपो दराबाबत काय म्हणाले शक्तिकांत दास?

आरबीआय गव्हर्नर यांनी रेपो दरावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आरबीआय लिक्विडिटी आणि दर वाढविण्याबाबत निर्णय घेताना आरबीआय नेहमीच विकासावर लक्ष्य ठेवून असते. आरबीआयच्या चलनाबाबत आणि धोरणाबाबत समिती मोठ्या प्रमाणात निर्णय घेत असते.

- Advertisement -

हेही वाचा : सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींच्या सचिवालयातून आंदोलकांना हुसकावलं, ५० जण जखमी; ९ जणांना अटक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -