घरभक्तीश्रावणात मांसाहार का करू नये? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व?

श्रावणात मांसाहार का करू नये? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व?

Subscribe

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. त्यामुळेच अनेकजण या महिन्यात पूर्णपणे सात्विक आहार करतात. अगदी पूर्वीपासून श्रावणात मांसाहार करू नये असं वडिलधाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक मान्यतेमागे वैज्ञानिक तर्क सुद्धा जोडले आहेत.

श्रावणात का करू नये मांसाहार?

- Advertisement -

  • धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. कारण यामुळे शरीरात वात वाढतो. यामागचं खरं वैज्ञानिक कारण असं की, या वातावरणात हिरव्या पालेभाज्यांवर किडे असतात. त्यामुळे तुमची प्रकृती खराब होऊ शकते.
  • श्रावणमध्ये वांग खाण्यास देखील मनाई केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याला अशुभ मानले जाते. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या यामध्ये किड लागलेली असते.
  • श्रावणात दूध, दही, पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाण्यास देखील मज्जाव केला जातो. मात्र खरंतर या पजार्थांमुळे तुमच्या शरीरातील वात वाढू शकतो.
  • धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणात मांसाहार करू नये अशी मान्यता आहे. वैज्ञानिकदृष्ट्या अशा वातावरणात शरीरामध्ये मांसाहार पचवण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसते. तसेच या काळात माश्यांच्या प्रजनन काळ सुरू असतो.
  • श्रावणात लसूण, कांदा खाणं देखील अनेकजण टाळतात. खरंतर या काळात शरिरामध्ये कांदा, लसूण खाल्ल्याने राग, तणाव या समस्या निर्माण होणार आहेत.

हेही वाचा :Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल मालामाल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -