घरमनोरंजनबाप्पासोबत खास फोटो: चिमुकल्या परीचा मराठमोळा साज; तिलाही लागलीय गणेशोत्सवाची आस

बाप्पासोबत खास फोटो: चिमुकल्या परीचा मराठमोळा साज; तिलाही लागलीय गणेशोत्सवाची आस

Subscribe

नऊवारी साडी आणि हातात बाप्पाची सुरेख मूर्ती घेऊन परीने म्हणजेच मायराने एक खास फोटो शूट केलं आहे.

माझी तुझी रेशीमगाठ(majhi tujhi reshimgath) या मालिकेतील परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा हिने आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात घर केलं आहे. मायरा नेहमीची काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. मायरा सोशल मिडीयावरून तिचे डान्स व्हिडीओ पोस्ट करत असते. शूटिंग दरम्यान सुद्धा मायाराची सेट वर मजा मस्ती सुरूच    असते. इतर कलाकारांचीही मायरा(mayra waykul) म्हणजेच परी लाडकी झाली आहे. मायराने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्याचीच चर्चा सध्या पाहायला मिळते आहे.

हे ही वाचा –  समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा

- Advertisement -

श्रावण महिना सुरु झाला की सर्वानाच ओढ लागते ती लाडक्या बाप्पाची. लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्वंच भक्त गणेशोत्सवाची(ganeshotsav 2022) उत्साहात तयारी करत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीला सुद्धा बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. नऊवारी साडी आणि हातात बाप्पाची सुरेख मूर्ती घेऊन परीने म्हणजेच मायराने एक खास फोटो शूट केलं आहे.

 

- Advertisement -

१-   माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळने गणपती बापाचं लोभसवाणं रूप असलेली मूर्ती घेत एक खास फोटो शूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सध्या चर्चा सुरु आहे.

 

२- गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसतो आहे.

 

३- मायराने नऊवारी साडी, नथ, कपाळावर चंद्रकोर आणि हातात बाप्पाची मूर्ती असं फोटोशूट केलं आहे. मायरा सुद्धा बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहे.

 

४-  मराठमोळ्या शृंगारात मायर खूप गोड दिसते आहे. बाप्पाची मूर्ती सुद्धा सोबत असल्याने या फोटोच्या सौंदर्यात अधीकच भर पडली आहे.

 

५- या फोटोमध्ये चिमुकली परी म्हणजेच मायरा गणपती बाप्पाला न्याहाळताना दिसते आहे. ती बाप्पाकडे कुतूहलाने पहाते आहे.

 

६- मायाराचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी सुद्दा त्याला पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. परी या  व्यक्तिरेखेमुळे मायराला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

—————————————————————————————————–

हे ही वाचा – ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,’ लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -