घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली, ईडी कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

संजय राऊतांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली, ईडी कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

Subscribe

याप्रकरणात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस मदत करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. 

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आक्रमक झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (Enforcement Directorate) दक्षिण मुंबईच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार आहे. त्यामुळे कार्यालय परिसरात कालपासून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच, परिसरात नाकाबंदी लावण्यात आली असून सीरआरपीएफच्या जवांनाचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. (Nationalist congress party will protest outside of ed office in the favour of Sanjay Raut)

हेही वाचा – राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याचा वाद दाबण्यासाठीच संजय राऊतांना अटक, शिवसेनेचा दावा

- Advertisement -

ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळपासूनच संजय राऊत यांच्या घरी चौकशी सत्र सुरू केले होते. साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. तिथे आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. संजय राऊत यांचे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे याप्रकरणात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस मदत करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा – संजय राऊतांना अखेर अटक, ईडीकडून तब्बल १७ तास चौकशी

- Advertisement -

संजय राऊत यांच्यांशी संबंधित मालमत्तांवर ईडीने याआधीही छापे टाकले होते. तेव्हा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत चर्चाही केली होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई झालेली असतानाही पवारांनी नरेंद्र मोदींकडे राऊतांचा मुद्दा मांडला होता. दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळातही शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील सख्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांना या संकटातून बाहेर काढणार का हे पाहावं लागणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -