घरठाणे'त्यांनी' विचार करावा की, काय करून बसलोय; केदार दिघेंची मुख्यमंत्री शिंदेवर टीका

‘त्यांनी’ विचार करावा की, काय करून बसलोय; केदार दिघेंची मुख्यमंत्री शिंदेवर टीका

Subscribe

शिवसेना संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनी यासाठी प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागाळातील कार्यकरत्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. आता मला जिल्हाप्रमुखपद दिले आहे. त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचे काम मी करणार आहे. शिवसेना कुणाची मक्तेदारी नाही, अशी टीका ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

जिल्हाप्रमुख केदार दिघे म्हणाले की, जेव्हा शिवसैनिकांची साथ असते तेव्हा कितीही मोठा संघर्ष असला तरी तो सोपा असतो. मला लहान वयात जिल्हाप्रमुख पद मिळाले आहे. माझ्यासारख्या तरूणाला हे पद ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. शिवसेना कुणाची मक्तेदारी नाही बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

माझ्यावर दिघेसाहेबांचे संस्कार आहेत. पक्षाशी एकनिष्ठ, पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहणे हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायचे आहे. दिघे साहेबांनी घडवलेल्या शिवसेनेत इतके मोठे पद मिळणे माझ्यासाठी भाग्याचे होते. मी खूप भावनिक आहे. आत्ता जी परिस्थिती आहे ती संघर्षाची असून त्यातून मी संघटना पुढे जाऊन जाणार आहे. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. विचारांचा वारसा पुढे घेऊन चालले असतील तर शुभेच्छा देतो. त्या विचारांना जागृत होऊन त्यांनी विचार करावा ते काय करून बसलेत. विचारांचा वारसा एकट्यापुरता मर्यादित नाही. हा विचार प्रत्येक कार्यकर्ता जपत आहे असंही जिल्हाप्रमुख केदार दिघेंनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -