घरक्रीडाएकाच नावाची जर्सी घालून भारताचे तीन खेळाडू उतरले मैदानात

एकाच नावाची जर्सी घालून भारताचे तीन खेळाडू उतरले मैदानात

Subscribe

वनडे मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या तीन खेळाडूंनी एकाच खेळाडूची जर्सी घातली होती.

वनडे मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या तीन खेळाडूंनी एकाच खेळाडूची जर्सी घातली होती. त्यामुळे प्रेक्षकांसह सर्वच चकीत झाले होते. अर्शदीप सिंग या खेळाडूची जर्सी घालून तिघे जण मैदानात उतरले होते.

प्रथम सूर्यकुमार यादवने अर्शदीपची जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्यानंतर वेगवान गोलंदाज आवेश खानही अर्शदीपची जर्सी घालून मैदानात उतरला होता. दरम्यान, ढिसाळ मॅनेजमेंटमुळे सर्व खेळाडूंचे सामान मैदानात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे दुसरा टी-२० सामना संध्याकाळी ८ ऐवजी रात्री ११ वाजता सुरू झाला. मात्र, तोपर्यंतही सर्व खेळाडूंचे सामान आले नव्हते. परिणामी खेळाडूंना एकमेकांची जर्सी घालून खेळावे लागले.

- Advertisement -

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या व्यवस्थापनावर चांगलाच संतापला होता. सामन्यादरम्यान रोहितचा संताप स्पष्ट दिसत होता. तसेच, रोहित या सामन्यात शुन्यावर बाद झाला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने कमी धावसंख्या करूनही शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र अखेरच्या षटकात आवेश खानच्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला.

वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. अशा स्थितीत कर्णधार रोहितने भुवनेश्वर कुमारऐवजी आवेश खानवर विश्वास दाखवला. आवेशने पहिला चेंडू नो बॉल टाकला. यानंतर पुढच्या चेंडू फ्री हिटवर फलंदाजाने षटकार मारला. त्यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून वेस्ट इंडिजने सामना जिंकला.

- Advertisement -

वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकॉयने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १७ धावा देत ६ बळी घेतले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. मॅकॉयने एकट्याने भारतीय फलंदाजीचा धुव्वा उडवला.


हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोत भारताच्या सुशीला देवीने पटकावले रौप्यपदक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -