घरट्रेंडिंगराज्यात 1886 नवे कोरोना रुग्ण; 2106 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात 1886 नवे कोरोना रुग्ण; 2106 रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच आज राज्यात 1 हजार 886 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच आज राज्यात 1 हजार 886 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तसेच, एकूण 2 हजार 106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (new 1886 corona patients in Maharashtra)

राज्यात मंगळवारी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78 लाख 89 हजार 478 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके झाले आहे. राज्यात एकूण 12 हजार 583 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3 हजार 665 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1 हजार 955 सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 897 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 33 लाख 83 हजार 787 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 39 हजार 792 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.32 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इतकच नाही तर नवीन रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

- Advertisement -

देशात सोमवारी दिवस 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित आढळले असून रविवारी दिवसभरात देशात 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. तसेच, 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावरील छापेमारी सूडबुद्दीने, नाना पटोलेंचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -