घरमहाराष्ट्रकाँग्रेसचा एल्गार; मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी, संजय निरुपमसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेसचा एल्गार; मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी, संजय निरुपमसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक चारचाकी, टॅक्सी आणि खासगी बसमध्ये तापसणी करण्यात येत आहे. तसेच, काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस बजावण्यात आली असून नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.

सतत वाढणारी महागाई, जीएसटी, बेरोजगारी आणि तपास यंत्रणांचा गैरवापर या मुद्द्यावरून काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले आहे. मुंबईतही राजभवानाला घेराव घालण्यात येणार आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरता काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत. दरम्यान, काँग्रसेचे नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे , वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Sanjay nirupam detained by Mumbai police)

हेही वाचा – ७० वर्षांत कमावलेलं आठ वर्षांत गमावलं, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

काँग्रेसकडून राजभवनावर घेराव घालण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत मलबार हिलकडे जाणाऱ्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक चारचाकी, टॅक्सी आणि खासगी बसमध्ये तापसणी करण्यात येत आहे. तसेच, काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस बजावण्यात आली असून नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.


राजभवनापर्यंत मोर्चा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. या निदर्शनांवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात एक विशेष पथकही तयार करण्यात आलं आहे. तसंच, ब्लॉक-जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनाही मुख्यालयाबाहेर निदर्शने करून अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -


काँग्रेसचा राजभवनाला घेराव –

लष्कराची अग्निपथ योजना, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढती जीएसटी आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेला सत्याग्रह जोपर्यंत सरकार कोणताही दिलासा देत नाही, तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी म्हटले आहे. 5 ऑगस्ट रोजी काँग्रेस देशभरात याविरोधात आंदोलन करणार आहे.

हेही वाचा …तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, काँग्रेस नेत्यांना पोलिसांची नोटीस

दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचाही घेराव काँग्रेस करणार आहे . काँग्रेस राज्यांमध्ये राजभवनाचा शांततेने घेराव करेल. यावेळी पोलिसांनी अटक केल्यास काँग्रेस नेते अटक करुन घेतील. लांबा म्हणाल्या की, वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरील चर्चेपासून केंद्रातील मोदी सरकार दोन आठवडे पळकाढत राहीले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -