घरमहाराष्ट्रकोणतेही बेकायदेशीर कृत्य आमच्याकडून होणार नाही; सत्तासंघर्षावर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

कोणतेही बेकायदेशीर कृत्य आमच्याकडून होणार नाही; सत्तासंघर्षावर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही युक्तिवाद झाला. यावेळी न्यायाधीश कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असतो, त्यामुळे तो पक्षाच्या भूमिकेतूनच निर्णय घेत असतो. अस वक्तव्य न्यायाधीशांनी केले. या सत्तासंघर्षावर आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतेही बेकायदेशीर कृत्ये हे आमच्याकडून कधी होणार नाही, याबद्दल आश्वस्त रहा, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर विशेष काही बोलवण्यासारखं नाही. कोर्टासमोर ज्या बाबी मांडल्या त्यावर कोर्ट निर्णय घेईल. परंतु विधिमंडळात कामकाज कसं चालवायचं किंवा विधीमंडळातील कामकाज चालवण्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचे.. माझ्या ज्ञानात जे आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे सांगू शकतो की, संपूर्ण अधिकार हे अध्यक्षांचे किंवा सभापतींचे आहेत. त्यामुळे पीटासीन अधिकारी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा सभागृहात व्यवस्थित कामकाज होण्यासाठी आणि सभागृहाचे काम व्यवस्थितरित्या चालण्यासाठी जे निर्णय घेणे आवश्यक असतं ते निर्णय नियमानुसार आणि प्रथापरंपरेनुसार त्यानुसार घेत असतो. असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.


मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -