घरदेश-विदेश'राम मंदिर नव्हे भगवान बुद्धांचे मंदिर हवे'

‘राम मंदिर नव्हे भगवान बुद्धांचे मंदिर हवे’

Subscribe

भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर रावण अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. ज्या जागेवर राम मंदिरासाठी वाद घातला जात आहे, तिथे भगवान बुद्धांचे मंदिर होते, असे चंद्रशेखर रावण म्हणत आहेत.

अयोध्येत राम मंदिरांच्या बांधकामाला सुरुवात व्हावी, यासाठी देशातील सर्व हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधले जावे यासाठी विश्व हिंदू परिषदेने रविवारी महासभेचे आयोजन केले होते. या महासभेत दोन लाख रामभक्त आले होते. त्याचबरोबर राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसाचा अयोध्या दौरा केला. यानंतर आता सोमवारी भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर रावण अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. ज्या जागेवर राम मंदिरासाठी वाद घातला जात आहे, तिथे भगवान बुद्धांचे मंदिर होते, असे चंद्रशेखर यांनी सांगितले आहे. अयोध्येत गेल्यावर ते माध्यमांशी बोलत होते. अयोध्येच्या विवादित जागेवर भगवान गौतम बुद्धांचेच मंदिर बांधले जावे असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर अयोध्या शहराचे खरे नाव साकेत असे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – राम मंदिर भाजपचा एकाधिकार नाही; उमा भारतींचा शिवसेनाला पाठिंबा

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर?

चंद्रशेखर म्हणाले की, संविधान आज धोक्यात आहे. जेव्हा सांप्रदायिक राजकीय पक्षांना सत्ता हवी असते, तेव्हा ते अयोध्येमध्ये पोहोचतात. आपण सोमवारी अयोध्येच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेणार असून त्यांना संविधानाची एक प्रत देणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर चंद्रशेखर म्हणाले की, सध्याचे अयोध्याचे वातावरण बघितले तर १९९२ च्या विध्वंसक दिवसांची आठवण येते. आता पुन्हा तसेच वातावरण निर्माण केले जात आहे. देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपले कर्तव्य विसरल्यामुळेच असे प्रकार घडत असून भाजप सरकार आपले अपयश लपवण्यासाठी हे नाटक करत असल्याचे चंद्रशेखर म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार साध्वी सावित्रीबाई फुले यांनी सांगितले होते की, अयोध्येत राम मंदिरच्या एवजी बुद्ध मंदिर बनवले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले होते की, हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा सर्व बहुजन समाज एकत्र येईल.


हेही वाचा – हुंकार रॅलीमध्ये मोहन भागवतांचा हुंकार, राम मंदिर झालंच पाहिजे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -