घरमहाराष्ट्रयाही वर्षी गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस धावणार; वेळ, ठिकाण आणि तारीख...

याही वर्षी गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस धावणार; वेळ, ठिकाण आणि तारीख जाणून घ्या

Subscribe

या वर्षी सुद्धा कोकणात गणेशोस्तवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोदी एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

यावर्षी ३१ ऑगस्ट पासून गणेशोत्सव(ganeshotsav 2022) सुरु होणार आहे. पण बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हटलं की त्याची एक वेगळीच ओढ असते. गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले की मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना त्यांचं कोकणातलं गाव साद घालू लागतं. त्याचबरोबर कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यातील अनेकांना ट्रेन च्या तिकिट्स मिळत नाहीत. किंवा काही वेळा कन्फर्म तिकीट घेण्यासाठी ज्यादा पैसे अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. दरम्यान या वर्षी सुद्धा कोकणात गणेशोस्तवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोदी एक्स्प्रेस(modi express) धावणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नितेश राणे(bjp mla nitesh rane) यांनी दिली.

- Advertisement -

काय गाव वाल्यांनो गणपतीला(ganeshotsav) गावी जायची तयारी झाली का असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी मोदी एक्स्प्रेसची माहिती दिली आहे. नितेश राणे(nitesh rane) म्हणाले, ‘या वर्षीही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस असणार आहे. गेल्या १० वर्षांपासून बस सेवा कोकणात जाणाऱ्यांसाठी सुरु आहे. तर मागिल वर्षीपासून मोदी एक्स्प्रेस सूर करण्यात आली आहे. यावर्षी सोमवारी २९ ऑगस्ट २०२२ रोजी ही विशेष मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस सकाळी १० वाजता दादर(dadar) रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सोडण्यात येत आहे. ही तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस आहे’ असंही नितेश राणे म्हणाले.

 

- Advertisement -

हे ही वाचा – अरे वा! गणपतीत कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त ३२ रेल्वेगाड्या, आजपासूनच बुकिंग सुरू

‘ही एक्स्प्रेस दादर ते कणकवली अशी धावणार आहे. दादर ते कणकवली दरम्यान वैभववाडी स्थानकावर थांबणार आहे. त्याच बरोबर मोदी एक्स्प्रेस मध्ये प्रवाश्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा दिले जाणार आहे. त्याचबरोबर आरती संग्रहाचं पुस्तक सुद्धा केलं जाणार आहे. सगळी तयारी झाली आहे. असं ही नितेश राणेंनी सांगितले’.

हे ही वाचा – कोकणात ‘या’ कालावधीत समुद्राला मोठ्या लाटांची शक्यता; किनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मोदी एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी भाजपच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांशी संपर्क करायचा आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी इथल्या भाजपच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांशी संपर्क करायचा आहे. असं आवाहनही नितेश राणे यांनी केलं आहे.

हे ही वाचा – पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरळीत वाहतुकीसाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -