घरताज्या घडामोडीईडी कोठडीतून राऊतांनी लेख कसा लिहिला?, मनसेचा 'रोखठोक' सवाल

ईडी कोठडीतून राऊतांनी लेख कसा लिहिला?, मनसेचा ‘रोखठोक’ सवाल

Subscribe

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. आज ८ ऑगस्ट रोजी संजय राऊतांची ईडी कोठडी संपत आहे. त्यामुळे राऊतांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, राऊत हे आणखी एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काल(रविवार) संजय राऊतांचा साप्ताहिक कॉलम रोखठोक प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु राऊत हे जर ईडी कोठडीत असतील तर सामनामध्ये त्यांचा लेख कसा काय छापून येऊ शकतो?, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित करत याविषयी आक्षेप नोंदवला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संदीप देशपांडे?

आज सामनामध्ये संजय राऊतांचं रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की, त्यांना जेलमधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

ईडीच्या अधिकाऱ्यांनाही हाच प्रश्न पडला असून ईडीकडून राऊतांची चौकशी केली जाणार आहे. संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कॉलम लिहू शकत नाहीत. न्यायालय त्यांना जोपर्यंत विशेष परवानगी देत नाही, तोपर्यंत ते काहीही करू शकत नाहीत. परंतु कोर्टाने त्यांना अशी कुठलीही परवानगी दिलेली नाहीये की, त्यामुळे त्यांनी तुरूंगात लेख लिहावा, परंतु जर त्यांनी हा लेख लिहिला असेल तर तो बाहेर कसा गेला?, यासंदर्भात चौकशी ईडी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

रोखठोकमध्ये नेमकं काय?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवरून वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावरून संजय राऊतांनी सामनात रोखठोक लिहिला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : दुसऱ्या रांगेत उभे केल्यानंतर शिवरायांनी दरबार सोडला, पण आता……राष्ट्रवादीची बोचरी टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -