घरदेश-विदेशबिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, चिराग पासवान यांची राज्यपालांकडे मागणी

बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, चिराग पासवान यांची राज्यपालांकडे मागणी

Subscribe

नितीश कुमार यांनी विश्वासर्हातता गमावली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी. नितीश कुमार यांची काही विचारधारा आहे की नाही? पुढच्या निवडणुकीत जदयू पक्षाला शुन्य जागा मिळतील असाही दावा चिराग पासवान यांनी केला आहे.

पाटणा – महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच बिहारमध्येही राजकीय उलथापालथ सुरू आहे. बिहारचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकार कोसळले आहे. तर नितीश कुमार आता आरजेडीच्या तेजस्वी यादव (Tejswi Yadav) यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी लोजपा नेता चिराग पासवान यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी विश्वासर्हातता गमावली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी. नितीश कुमार यांची काही विचारधारा आहे की नाही? पुढच्या निवडणुकीत जदयू पक्षाला शुन्य जागा मिळतील असाही दावा चिराग पासवान यांनी केला आहे. (Chirag paswan demand president rule in bihar)

हेही वाचा – बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

- Advertisement -

नितीश कुमार असे मुख्यमंत्री आहेत जे आपल्या शब्दांवर ठाम राहत नाहीत. त्यामळे बिहारमध्ये निवडणुका लागाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. युती तोडून पुन्हा नव्याने दुसऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन करणं योग्य नाही. लोकशाहीच्या मंदिरात उभं राहून भाजपसोबत युती करणार नाही अशी शपथ घेतलेल्या नितीश कुमार यांनी २०१७ मध्ये भाजपसोबतच सत्ता स्थापन केली.

चिराग पासवान यांच्यांनंतर केंद्रीय मंत्री आणि लोजपा नेता पशुपति कुमार पारस यांनीही या सत्तासंघर्षावर टीका केली आहे. जे काही झालं ते चांगलं झालं नाही. पूर्वीही असं झालं आहे. आरजेडी आणि जेडीयू सरकार याआधीही सत्तेवर होतं. मात्र, हे सरकार चाललं नाही. बिहारच्या विकासासाठी हे शुभ संकेत नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम ठेवत नितीश कुमारांचे 17 वर्षे धरसोडीचे राजकारण

दरम्यान, नितीश कुमार यांनी आमदार, खासदारांशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. दरम्यान, थोड्याच वेळात आरजेडीचे तेजस्वी यादव राज्यपालांच्या भेटीला पोहोचणार आहेत. या भेटीनंतर ते सत्तास्थापनेचा दावा करू शकतील. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी उद्या सकाळीच होण्याची शक्यता आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -