घरक्रीडा'या' खेळाडूला दुखापत; झिम्बॉव्वे दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का

‘या’ खेळाडूला दुखापत; झिम्बॉव्वे दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का

Subscribe

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बॉव्वे दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 18 ऑगस्टपासून भारत आणि झिम्बॉव्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बॉव्वे दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 18 ऑगस्टपासून भारत आणि झिम्बॉव्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाली आहे. त्यामुळे सुंदर दुखापतीतून बरा न झाल्यास त्यांच्या जागेवर कोणाला स्थान दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (India vs Zimbabwe Washington sunder injured vp96)

वॉशिंग्टन सुंदरला झालेली दुखापत गंभीर आहे की नाही, याबाबत अस्पष्टता आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याचा सरावही थांबला आहे. वॉशिंग्टन सुंदर गेल्या दोन वर्षांपासून दुखापतीशी सामना करतो आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या काऊंटी क्रिकेटद्वारे मैदानात पुरागमन केले होते. काऊंटी क्रिकेटमध्ये सुंदर चेंडूने अप्रतिम कामगिरी केली. त्याने काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यातच पाचहून अधिक विकेट्स घेतले. तसेच, त्याने अर्धशतकी खेळीही केली होती.

- Advertisement -

रॉयल लंडन वन डे चषकात लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सुंदर सहभागी झाला होता. परंतु, क्षेत्ररक्षण करताना सुंदरला दुखापत झाली. त्यावेळी सुंदरला मैदानाबाहेर जावा लागले होते. आता या सामन्यात त्याला गोलंदाजी करता येणार नसल्याची माहिती सुंदरच्या संघाने दिली आहे.

भारत- झिम्बॉव्वे वनडे वेळापत्रक

- Advertisement -

           सामना                   कधी                ठिकाण

  • पहिला वनडे सामना        18 ऑगस्ट        हरारे स्पोर्ट्स क्लब
  • दुसरा वनडे सामना         20 ऑगस्ट        हरारे स्पोर्ट्स क्लब
  • तिसरा वनडे सामना        22 ऑगस्ट         हरारे स्पोर्ट्स क्लब

तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारताने झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी 2016 मध्ये भारताने झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळली होती.


हेही वाचा – ४९ वी राज्य अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा; पुणे सांघिक विजेता, तर ठाणे उपविजेता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -