घरमनोरंजनमनोरंजनाचा डबलडोस; 'या' आठवड्यात चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा OTT वर प्रदर्शित होणार

मनोरंजनाचा डबलडोस; ‘या’ आठवड्यात चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा OTT वर प्रदर्शित होणार

Subscribe

जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या वेब सिरीज बाबी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची लकप्रियता वाढत आहे. हीच वाढती लोप्रियता लक्षात घेता निर्माते त्यांची वेब सिरीज किंवा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यावर जास्त भर देत आहेत. प्रेक्षकांनासुद्धा तोटीटी प्लॅटफॉर्म दररोज नवनवीन कॉन्टेन्ट पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आकृष्ट होत आहेत. त्यात विकेंडला तर प्रेक्षकांसाठी नवीन आणि वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात.

या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. कारण या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध आशयाचे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या वेब सिरीज बाबी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – चमचमीत रेसिपीजनंतर मधुरा झळकणार ‘या’ प्रसिद्ध मालिकेत

१) शाबास मिथु 

- Advertisement -

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित शाबाश मिथू हा चित्रपट 15 जुलै रोजी प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यानंतर आता ओटीटी (OTT) वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने मिताली राजची व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट 15 ऑगस्टपासून ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहता येणार आहे.

२) द वॉरियर 

‘एन. ‘लिंगू स्वामी’ दिग्दर्शित ‘द वॉरियर’ हा चित्रपट देखील या आठवड्यात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता राम पोथेनेनी पोलिसाच्या मुख्य भूमिकेत दिसला होता. अॅक्शन आणि थ्रिलरने परिपूर्ण असलेला हा चित्रपट 15 ऑगस्टला डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

३) तामिल रॉकर्स 

ही नवीन तमिळ वेब सिरीज चित्रपट पायरसी साइट तमिळ रॉकर्सवर आधारित आहे. या साइट्स मनोरंजन सृष्टीसाठी खूप मोठा धोका आहेत. ज्यामुळे कोणताही चित्रपट प्रदर्शित होताच लीक होतो. या मालिकेत अरुण विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसाइट प्रत्यक्षात कशी काम करते आणि वेबसाइटवर नवीन चित्रपट कसे जोडले जातात हे या वेब सिरीजमध्ये दाखवले जाईल? ही वेब सिरीज 19 ऑगस्टपासून सोनी लिव्हवर प्रसारित केली जाणार आहे.

४) हेवन 

स्वर्ग हा उन्नी गोविंदराज दिग्दर्शित क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. सूरज वेंजरामुडू, सुधीश आणि विनय प्रसाद य अभिनेत्यांनी यात काम केले आहे. य चित्रपटाची कथा पीटर कुरीशिंगल (सूरज वेंजारामुडू) यांचा मुलगा, त्याचा वर्गमित्र आणि कुटुंब यांच्या हत्येच्या तपासाभोवती फिरते . हा चित्रपट 19 ऑगस्टपासून डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

५) शी – हल्क 

‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये सर्वात पॉवरफुल सदस्य ‘हल्क’ची बहीण ‘शी-हल्क’ हिचाही प्रवेश झाला आहे. मार्वल स्टुडिओ आणि डिझनी यांनी यापूर्वीच ‘शी-हल्क’ वेब सीरिजच्या ट्रेलरसह रिलीजची तारीख जाहीर केली होती. डिझनी प्लस हॉटस्टारवर 17 ऑगस्टपासून प्रेक्षक पाहू शकणार आहेत. हचित्रपट इंग्रजी बरोबरच हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये पाहता येणार आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -