घरमनोरंजनचमचमीत रेसिपीजनंतर मधुरा झळकणार 'या' प्रसिद्ध मालिकेत

चमचमीत रेसिपीजनंतर मधुरा झळकणार ‘या’ प्रसिद्ध मालिकेत

Subscribe

र्व गृहिणींची लाडकी मधुरा आता लवकरच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ही बातमी मिळताच तिच्या चाहत्यांमध्ये मधुराला छोट्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोणताही खंमंग पदार्थ आणि मधुराज रेसिपीजची(madhura’s recipe) मधुरा बाचल यांचं वेगळं समीकरण तयार झालं आहे. खमंग, चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपींबाबत मार्गदर्शन करणारी मधुरा बाचल ही संपुर्ण महाराष्ट्रचीच लाडकी झालेली आहे. मधुरा तिच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून खवय्यांसाठी नेहमीच वेगवेगळे खमंग पदार्थ घेऊन येत असते. सर्व गृहिणींची लाडकी मधुरा आता लवकरच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर(marathi serial) पाहायला मिळणार आहे. ही बातमी मिळताच तिच्या चाहत्यांमध्ये मधुराला छोट्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा – ‘श्यामची आई’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -

मधुराज रेसिपीजची मधुरा बाचल नेहमीच आपल्याला किचन मध्ये वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनविताना दिसते. पण आता हीच मधुरा मालिकेत सुद्धा झळकणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं'( sukh mhnaje nakki kay asat) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग सुद्धा आहे. या लोकप्रिय मालिकेमध्ये अनेक वळणं सुद्धा येत आहेत अशातच या मालिकेत आणखी एक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मधुराज रेसिपीजची(madhura’s recipe) मधुरा बाचल(madhura bachal) लवकरच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत दिसणार असल्याचं अमोर आलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Independence Day 2022: देशाच्या 75 वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रातील या रत्नांचा मोलाचा वाटा

दरम्यान झी मराठी या वाहिनीवरून ‘किचन कल्लाकर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आधीही मधुरा छोट्या पडद्यावर झळकली होती. त्यावेळीही तिच्या चाहत्यांनी तिला उत्तम प्रतिसाद दिला होता. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं'(sukh mhnaje nakki kay asat) या मालिकेत मधुरा (madhura bachal) नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे ही वाचा – मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून चौकशी सुरु

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -