घरदेश-विदेशविमान उड्डाणावेळी पायलट झोपला

विमान उड्डाणावेळी पायलट झोपला

Subscribe

ऑस्ट्रेलियामध्ये विमान उड्डाणावेळी पायलट झोपला. याप्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच पायलटची चौकशी होणार आहे.

झोप तर सर्वांना येतेच. पण कामाच्यावेळी ऑफिसमध्ये अनेकांना झोप लागल्याचे अनेकदा ऐकले आहे. मात्र विमान चालवाताना कोणी झोपला हे तर कधीच ऐकले नसेल. पण असे घडले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका पायलटला विमान चालवताना अचानक झोप लागली. मग काय विमान मार्ग भरकटले आणि इकडे तिकडे फिरत राहिले.

विमानात फक्त पायलट होता

ऑस्ट्रेलियामध्ये एका छोट्या विमानाच्या पायलटला उड्डाण घेतल्यानंतर झोप आली. त्यानंतर विमान गंतव्यपासून भरकटले आणि दुसरीकडेच पोहचले. बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाइपर पीए – ३१ विमानामध्ये फक्त पायलटचं होता. या विमानाने ८ नोव्हेंबरला तस्मानियातील डेनानपोर्टच्या किंग द्वीपवरुन उड्डाण घेतले होते. याप्रकरणाची ऑस्ट्रेलिया परिवहन सुरक्षा ब्युरोद्वारे तपास सुरु आहे.

- Advertisement -

पायलटची चौकशी होणार

मात्र अधिकाऱ्यांनी हे अद्याप सांगितले नाही की, विमानाचे सुरक्षित रुपाने लँडिंग होण्यापूर्वी पायलटला कशी जाग आली. एटीएसबीने सांगितले की, उड्डाण दरम्यान पायलट झोपला. ज्यामुळे विमान किंग आयलँडवर आपल्या गंतव्यपासून ४६ किलोमीटर पुढे निघून गेले. या प्रकरणामध्ये पायलटची चौकशी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -