घरदेश-विदेशभारतासोबत आम्हाला चांगले संबंध अपेक्षित - इम्नान खान

भारतासोबत आम्हाला चांगले संबंध अपेक्षित – इम्नान खान

Subscribe

भारतासोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत असा पुर्नउच्चार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी केला आहे. कर्तारपूर मार्गिकाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना त्यांनी भारत - पाकिस्तान संबंध सुधारले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारतासोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत असा पुर्नउच्चार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी केला आहे. कर्तारपूर मार्गिकाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना त्यांनी भारत – पाकिस्तान संबंध सुधारले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी इम्नान खान यांनी मी ज्यावेळी भारतात येतो तेव्हा लोक म्हणतात की, पाकिस्तानी लष्कराला भारतासोबत संबंध सुधारण्यामध्ये रस नाही. पण, तसं काहीही नाही. आमचा पक्ष, इतर राजकीय पक्ष आणि आर्मीला देखील भारतासोबत संबंध सुधरवण्यामध्ये रस आहे. मागील ७० वर्षापासून आम्ही एकमेकांसोबत भांडत आहोत. यामध्ये दोन्ही बाजूनं चुका झालेल्या आहेत. परस्परांना किती काळ दोष देत राहणार? यावर काहीतरी तोडगा निघालाच पाहिजे. त्यासाठी दोघांनी देखील दोन पावलं मागे येणं गरजेचं असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. काश्मीरचा प्रश्न माणुसकीच्या दृष्टीनं सोडवला पाहिजे असं देखील खान यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांनी यावर चर्चा केली पाहिजे तरच काश्मीरचा प्रश्न सुटेल असं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमण झाल्यानंतर इम्नान खान यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर देऊ असं म्हटलं आहे.

वाचा – राफेल करारावरून सिद्धू यांचा भाजपला टोला

इम्नान खान यांनी जरी भारतासोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत असं म्हटलं असलं तरी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया मात्र वाढल्या आहेत. दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत असून आत्तापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा लष्कारानं केला आहे. पण, आता भारतासोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत असा पुर्नउच्चार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी केला आहे. यावेळी इम्नान खान यांनी लष्कराला देखील भारतासोबत संबंध चांगले ठेवायचे आहेत असं म्हटलं असलं तरी लष्कराच्या हेतुबद्दल शंकाच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -