घरमनोरंजनविजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप - गरुडझेप' झळकणार रूपेरी पडद्यावर

विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप – गरुडझेप’ झळकणार रूपेरी पडद्यावर

Subscribe

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून, 5 ऑक्टोबर 2022 या विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवप्रताप - गरुडझेप' रसिकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आज संपूर्ण जगभर अभ्यासली जात आहे. महाराजांनी कशाप्रकारे शून्यातून स्वराज्य निर्मिती करत रयतेच्या राज्याची स्थापना केली याचे धडे जगभरातील सैनिकांना दिले जातात. रक्ताचा एकही थेंब न सांडता शत्रूच्या तावडीतून कशा प्रकारे सहिसलामत निसटून शत्रूवर मात येऊ शकते याचे उदाहरण शिवकालीन इतिहासात पहायला मिळतं. इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हाच प्रेरणादायी अध्याय आता ‘शिवप्रताप – गरुडझेप’ या आगामी भव्य मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून, 5 ऑक्टोबर 2022 या विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवप्रताप – गरुडझेप’ रसिकांच्या भेटीला येणार आहे.

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे यांची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप – गरुडझेप’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक केंढे यांनी केलं आहे. प्रफुल्ल तावरे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी लिहिली असून, युवराज पाटील यांच्या साथीनं त्यांनी संवादलेखनही केलं आहे. अमोल कोल्हेंसोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

- Advertisement -

छायाचित्रण संजय जाधव यांनी केलं असून, कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर यांचं आहे. पीटर गुंड्रा यांनी संकलन केलं असून, शशांक पोवार, रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे. रवींद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत, तर प्रशांत खेडेकर क्रिएटिव्ह कन्सल्टंट आहेत तर क्रिएटिव्ह सुपरवायझर ची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे. आजवर इतिहासाच्या पुस्तकांतून अनुभवलेला आग्र्याहून सुटकेचा थरार येत्या विजयादशमीला शिवप्रताप-गरूडझेप मधून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.


हेही वाचा :आदर्श शिंदेचे ‘श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…’ गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -