घरताज्या घडामोडीSBI, HDFC, ICICI सह सर्व बँकांचे WhatsApp बँकिंग; सुविधेसाठी 'असा' करा अर्ज

SBI, HDFC, ICICI सह सर्व बँकांचे WhatsApp बँकिंग; सुविधेसाठी ‘असा’ करा अर्ज

Subscribe

डिजिटल बँकिंगमुळे जीवन खूप सोपे झाले आहे. घरी बसून बँकिंग सेवा वापरता येणार असल्याने आता बँकेत जाण्याची चिंता भासणार नाही. सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल बँकिंग सोयीसकर जात आहे. अशातच आता व्हॉट्सअॅप बँकिंगही लोकप्रिय होत आहे.

डिजिटल बँकिंगमुळे जीवन खूप सोपे झाले आहे. घरी बसून बँकिंग सेवा वापरता येणार असल्याने आता बँकेत जाण्याची चिंता भासणार नाही. सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल बँकिंग सोयीसकर जात आहे. अशातच आता व्हॉट्सअॅप बँकिंगही लोकप्रिय होत आहे. यासाठी प्रमुख बँकांमध्ये WhatsApp बँकिंगसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी नोंदणी कशी करावी हे जाणून घ्या. (how to apply for whatsapp banking in BANK read in marathi)

स्टेट बँक ऑफ इंडिया WhatsApp बँकिंग

- Advertisement -

स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. याद्वारे SBI बॅंक आपल्या ग्राहकांना बॅलन्स चौकशी आणि मिनी स्टेटमेंट यासारख्या बँकिंग सेवा देत आहे.
SBI ग्राहक WhatsApp बँकिंग सेवा साइन अप असे करा.

  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9022690226 या नंबरवर ‘हाय’ पाठवा.
  • एसबीआय ग्राहकांना बँकेकडून व्हॉट्सअॅपवर संदेश येईल की तुम्ही एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिंग सेवांसाठी नोंदणीकृत नाही.
  • नोंदणी करण्यासाठी कृपया तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून WAREG Space खाते क्रमांक टाकून +917208933148 वर एसएमएस पाठवा.
  • यानंतर ग्राहकाची SBI WhatsApp बँकिंग सेवेसाठी नोंदणी केली जाईल.

hdfc बँक whatsapp बँकिंग

- Advertisement -

HDFC बँक चॅट बँकिंगद्वारे WhatsApp बँकिंग सेवा प्रदान करते. ग्राहक याद्वारे 90 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेण्यासोबतच 24×7 व्यवहार करू शकतात. ही एक एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आणि सुरक्षित बँकिंग सेवा आहे जी HDFC बँकेने WhatsApp वर प्रदान केली आहे.

  • एचडीएफसी बँकेच्या ग्राहकाला 7070022222 हा क्रमांक त्याच्या फोन बुकमध्ये सेव्ह करा.
  • त्यानंतर ‘हाय’ टाइप करून मेसेज पाठवावा लागेल.
  • काही मिनिटांतच तुमची WhatsApp बँकिंग सेवा सुरू होईल.
  • तुम्ही तुमच्या खात्याशी संबंधित माहिती तसेच क्रेडिट कार्ड, कर्ज आणि इतर सेवांबद्दल अतिरिक्त माहिती मिळवू शकता.

icici बँक whatsapp बँकिंग

ICICI बँक 24/7 x 365 WhatsApp बँकिंग सुविधा प्रदान करते. आयसीआयसीआय बँकेच्या व्हॉट्सअॅप बँकिंगद्वारेही ग्राहक कर्जासाठी अर्ज करू शकतात. बिले भरण्याव्यतिरिक्त, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, चेकबुक आणि पासबुकची डिलिव्हरी स्थिती येथे ट्रॅक केली जाऊ शकते. ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक, शेवटचे तीन व्यवहार, क्रेडिट कार्ड मर्यादा इत्यादी जाणून घेऊन त्यांचे कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करू शकतात. इतकंच नाही तर, इथे ते नवीनतम ऑफर आणि इतर ICICI बँकेच्या शाखा आणि ATM बद्दल माहिती देखील मिळवू शकतात.

  • तुमच्या मोबाईल फोन बुकमध्ये 8640086400 हा नंबर सेव्ह करा
  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ‘हाय’ टाइप करून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा.
  • तुम्ही 9542000030 वर मिस कॉल देखील देऊ शकता.

बँक ऑफ बडोदा whatsapp बँकिंग

बँक ऑफ बडोदाची व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. खात्यातील शिल्लक तपासण्याव्यतिरिक्त, मिनी स्टेटमेंट, डेबिट कार्ड ब्लॉक करणे आणि चेक बुक विनंती देखील करता येते. UPI आयडी डिलीट करण्यासारखे कामही येथे केले जाऊ शकते. कर्ज आणि FASTag बद्दल देखील माहिती मिळू शकते.

  • तुमच्या मोबाईलमध्ये बँकेचा WhatsApp व्यवसाय खाते क्रमांक 8433 888777 सेव्ह करा
  • WhatsApp वर HI पाठवा.

अॅक्सिस बँक whatsapp बँकिंग

अॅक्सिस बँकेचे ग्राहक व्हॉट्सअॅप बँकिंग देखील वापरू शकतात. ग्राहक बँक खात्याशी संबंधित सेवा तसेच बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट, चेक बुक, ओपन व्हिडिओ केवायसी, झटपट बचत खाते आणि डेबिट कार्ड ब्लॉक करणे यासह मुदत ठेव सेवांचा लाभ घेऊ शकतात. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटनुसार, यासाठी ग्राहकाला व्हॉट्सअॅपवर 7036165000 या क्रमांकावर हाय पाठवावे लागेल.


हेही वाचा – काळू धरणाच्या प्रक्रियेला वेग; पण खर्चात दुप्पट वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -