घरताज्या घडामोडीभाजपने सरकारे पाडण्यासाठी केला 6 हजार 300 कोटींचा खर्च; अरविंद केजरीवालांचा गंभीर...

भाजपने सरकारे पाडण्यासाठी केला 6 हजार 300 कोटींचा खर्च; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

Subscribe

भारतीय जनता पार्टी पक्षाने सरकार पाडण्यासाठी तब्बल 6 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टी पक्षाने सरकार पाडण्यासाठी तब्बल 6 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टिका केली आहे. (Bjp Spent 6300 Crore Toppling Governments Parties allegations of delhi cm arvind Kejriwal)

“भाजपने देशात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार पाडण्यासाठी तब्बल 6 हजार 300 कोटी रूपये खर्च केले आहेत. हा खर्च भाजपाने केला नसता तर, केंद्र सरकारला खाद्य पदार्थांवर GST लावायची वेळ आली नसते”, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच, “राज्य सरकारांचे सिरीयल किलर”, असा टोलाही केजरीवाल यांनी भाजपाला लगावला.

- Advertisement -

दिल्ली विधानसभेत बोलत असताना केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. यावेळी “पेट्रोल-डिझेल आणि जीएसटीच्या दरवाढीतून जमा झालेल्या पैशातून भाजपाने आमदारांना विकत घेत आहे”, असाही आरोप केजरीवाल यांनी केला.

याशिवाय, “भाजप करोडो रूपये खर्च करून विरोधी पक्षातील आमदार विकत घेवून राज्यात सरकार अस्थिर करत आहे”, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर केला आहे.

- Advertisement -

“दही, ताक, मध, गहू, तांदूळ इत्यादींवर जीएसटी लावण्यात आला आहे. या पदार्थाच्या माध्यमातून केंद्र सरकारला सुमारे 7 हजार 500 कोटी रूपये मिळाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातील सरकार पाडण्यासाठी त्यातील 6 हजार 300 कोटी रूपये खर्च केले आहेत. जर त्यांनी सरकार पाडली नसती तर गहू, तांदूळ, दही, यांसारख्या खाद्य पदार्थांवर GST लावण्याची गरज लागली नसती. लोकांना पण महागाईचा सामना करावा लागला नसता”, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.


हेही वाचा – पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण; 30 लाखांहून अधिक लोकांच्या घरांचे नुकसान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -