घरदेश-विदेशगांधींनंतर जनतेच्या भावना समजणारे मोदी एकमेव नेते, राजनाथ सिंहांकडून मोदींचे तोंडभरून कौतुक

गांधींनंतर जनतेच्या भावना समजणारे मोदी एकमेव नेते, राजनाथ सिंहांकडून मोदींचे तोंडभरून कौतुक

Subscribe

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशातील काही राज्यात एनडीएचे सरकार होते, आज ते 16 राज्यात आहे. देशातील 1300 पेक्षा जास्त आमदार आणि 400 पेक्षा जास्त भाजप खासदार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत. कारण त्यांची संघटनात्मक क्षमता, जनतेशी असलेले नाते आणि जनतेच्या अडचणींची असलेली जाण हे आहे. महात्मा गांधींनंतर जनतेच्या भावना समजणारे मोदी एकमेव नेते आहे. अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र डागले आहे. काही लोक मोदींना पर्याय शोधत आहेत पण त्यांना सापडत नसल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मोजी थेट लोकांशी जोडले जातात, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, जनतेसोबत राहिल्यास यश तुमच्या पायाशी लोळण घेते हा पंतप्रधान मोदींचा कानमंत्र आहे. जनतेसोबतचे नाते, संवाद, देशाच्या एकूण कारभारावर असलेली पकड आणि सर्वसामान्यांच्या अडचणींनी असलेली माहिती यामुळे मोदींच्या लोकप्रियतेने देशातील नाही तर जगभरातील नेत्यांना मागे टाकले आहे. आज ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत असे कौतुकोत्गार राजनाथ सिंह यांनी मोदींबाबत काढले आहे,

- Advertisement -

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास असं आवाहन करताना पंतप्रधान मोदींनी कोणाला जुमानले नाही, खरंतर मोदी याच मंत्राने पुढे जात आहेत. मोदींची विकास यात्रा एका दिवसात झाली नाही तर देशात अनेक वर्षांचा प्रवास करुन त्यांनी लोकांना समजून घेतले, देशाला समजून घेतले. सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला असं म्हणत राजनाथ सिंह यांनी मोदींच्या योजनेचे कौतुक केले.

अमेरिकन कंपनी द मॉर्निंग कन्सल्टनच्या सर्व्हेचा दाखला देत राजनाथ सिंह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगातील 12 प्रमुख राष्ट्राध्यक्षांना मागे टाकले, मोदींचे जनतेशी भावनिक नाते निर्माण झाले, ते पंतप्रधान होण्यापूर्वी देशातील काही राज्यात एनडीएचे सरकार होते, आज ते 16 राज्यात आहे. देशातील 1300 पेक्षा जास्त आमदार आणि 400 पेक्षा जास्त भाजप खासदार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.


कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार होईल ‘रनआऊट’; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -