घरमहाराष्ट्रनाशिकडोंगरे मैदानावर एकाच वेळी तीन कार्यक्रमांमुळे तारांबळ

डोंगरे मैदानावर एकाच वेळी तीन कार्यक्रमांमुळे तारांबळ

Subscribe

महानुभाव संमेलन, गणेशमूर्ती विक्री स्टॉल्स, हस्तकला साहित्य प्रदर्शन अश्या तीन-तीन बाबींना एकाच वेळी परवानगी कशी मिळाली ?

नाशिक : गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहावर एकाचवेळी तीन कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी दिल्याने पार्किंगचा सत्यानाश झाला. त्यामुळे गंगापूर रोडवर वाहतूक कोंडी झाली. परिणामी, वाहनचालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. आधीच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिक हैराण झाले असताना डोंगर वसतिगृहावर गर्दी आणि गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इतर कार्यक्रमांना परवानगी देताना नियोजन केले नाही का?, अशा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गंगापूर रोडवरील डोंगर वसतिगृह मैदानावर सहारा आर्ट अ‍ॅण्ड क्राप्ट सिल्क आणि कॉटन प्रदर्शन सुरु आहे. त्याचवेळी ८० हून अधिक गणेशमूर्ती विक्रेत्यांनी मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटली. शिवाय, डोंगरे वसतिगृह मैदानावर तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनही आयोजित करण्यात आले. त्यामुळे नाशिक शहरासह देशभरातील नागरिकांनी अलोट गर्दी केली. विशेष म्हणजे, नाशिक शहर पोलिसांनी फक्त महानुभव संमेलनस्थळी बंदोबस्त तैनात केला. मात्र, सिल्क व कॉटन प्रदशर्नस्थळी आणि गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. दुचाकीसह कारमधून नागरिक डोंगरे वसतिगृहाजवळ आले असता त्यांना सुरुवातील पार्किंगअभावी जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करणे पसंत केले. अनेकांनी डोंगरे वसतिगृह मैदानासह जुना गंगापूर नाका, मॅरेथॉन चौकासह गंगापूररोडवर रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केली. त्यामुळे वाहनचलाकांसह नागरिकांना मार्गस्थ होताना मनस्ताप सहन करावा. गर्दी आणि वाहतूक कोंडी असतानाही काही वाहतूक शाखेचे पोलीस बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना दिसून आले.

- Advertisement -

पोलिसांनी कारवाईआधी बंदोबस्तासह वाहतूक सुरळीत ठेवली असती तर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. डोंगरे वसतिगृहावर एकाच वेळी कार्यक्रमांना परवानागी देताना बंदोबस्तासह वाहतूक सुरळीत ठेवण्याचेही नियोजन करावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करु लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -