घरहिवाळी अधिवेशन २०१८मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करतंय – अजित पवार

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करतंय – अजित पवार

Subscribe

मराठा समाजाला आरक्षण मिळाले. धनगर समाजाबाबत सकारात्मक आहात मग मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे?' असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला.

आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. राज्य सरकारने काल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधेयक आणले. आरक्षण मिळणार म्हणून मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता धनगर-मुस्लिम समाजाला आरक्षण कधी देणार? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले. धनगर समाजाबाबत सकारात्मक आहात. मग मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे?’ असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला.

हेही वाचा – तिसर्‍या दिवशीही मराठा, धनगर आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार?

राज्यातील मुस्लिम समाज घटकामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. कालच सर्वानुमते मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजुर करण्यात आले आहे. तर धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे. मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार का बोलत नाही. राज्यसरकारने मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. हायकोर्टाने ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाचं मान्य केलं नाही परंतु स्थगितीही दिली नाही. जेव्हा स्थगिती मिळत नाही त्यावेळी तो निर्णय सकारात्मक असतो. त्यामुळे तो निर्णय झाला तर तो चांगल्याप्रकारचा मेसेज महाराष्ट्रात जावू शकतो. त्यामुळे सरकारने तशी भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणीही अजित पवार यांनी केली.

मुस्लिमांना SEBC मध्ये आरक्षण द्या – नसीम खान

आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला एसईबीसीमध्ये आरक्षण दिले होते. मात्र युती सरकारने ते टिकवले नाही. मुस्लिम समाजातील जे लोक मागास आहेत त्यांना विशेष प्रवर्ग बनवून आरक्षण द्या, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली आहे. नसीम खान म्हणाले की, आघाडी सरकारने मुस्लिम समाजातील ५२ मागास जातींना आरक्षण देऊ केले होते. या जातींना पुन्हा एकदा पाच टक्के आरक्षण लागू करा, या मागणीचा पुर्नउच्चार त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -