घरगणेशोत्सव 2022Ganesh Visarjan 2022 : गणपती विसर्जन करण्यापूर्वी 'या' चुका टाळा

Ganesh Visarjan 2022 : गणपती विसर्जन करण्यापूर्वी ‘या’ चुका टाळा

Subscribe

गणेश चतुर्थीपासून १० दिवस गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केल्या नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाच्या निरोपाचा देखावा पाहण्यासारखा असतो. गणपतीला निरोप देण्यासाठी त्यांचे भक्त उत्साहाने नाचतात. असं म्हणतात की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मनापासून केलेल्या मनोकामना पूर्ण होतात. यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन शुक्रवार, ९ सप्टेंबर रोजी आहे.

भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाची सुरूवात होते. चतुर्दशी तिथीपर्यंत गणेशाची आराधना केली जाते. श्री गणेश मूर्तीची स्थापना चतुर्थी तिथीला केली जाते आणि विसर्जन चतुर्दशीला केले जाते. असे म्हणतात की, बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर बाप्पा पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. या दिवशी अनंत शुभ फळ प्राप्त केले जाऊ शकतात, म्हणूनच या दिवशी अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते.

- Advertisement -

गणपती विसर्जनाची योग्य पद्धत
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून उपवास करावा. उपवास ठेवता येत नसेल तर फळे खावीत. घरात स्थापित मूर्तीची विधिवत पूजाविधिवत पूजा करावी. पूजेत नारळ, शमीची पाने आणि दुर्वा अर्पण करा. बाप्पाची आरती झाल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी न्या. मूर्ती लहान असल्यास मांडीवर किंवा डोक्यावर ठेवावी. मूर्ती घेऊन जाताना गणपतीला अक्षता अर्पण करा.

विसर्जन करण्यापूर्वी या चुका टाळा

- Advertisement -
  • मूर्ती विसर्जनासाठी नेणाऱ्य व्यक्तीने स्वतःजवळ लेदर बेल्ट, घड्याळ किंवा पर्स सोबत ठेवू नका.
  • मूर्ती अनवाणी वाहून विसर्जन करावी, यावेळी पायामध्ये चप्पल, बूट घालू नये.
  • मूर्ती विसर्जनासाठी नेताना बाप्पाच्या मूर्तीवर अक्षता आणि फुलं टाका.
  • विसर्जनानंतर, हात जोडून, ​​कल्याण आणि आनंदी जीवनासाठी श्री गणेशाला प्रार्थना करा.

गणेशमूर्तीचे विसर्जन करताना हे प्रयोग केले तर गणपती खूप प्रसन्न होतो. अनंत चतुर्दशीच्या व्रताने सर्व संकटे दूर होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -