घरमहाराष्ट्रपुणेगणपती पुढे सोडण्यावरून कोल्हापूरात वादावादी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

गणपती पुढे सोडण्यावरून कोल्हापूरात वादावादी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

Subscribe

कोल्हापूर – शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाला होता. त्यामुळे काहींनी रस्त्यांवरच ठिय्या मांडला.

मुख्य मिरवणूक मार्ग महाद्वार रोडवर प्रत्येक मंडळाला एक तासाची परवानगी असल्याने अनेक मंडळाकडून त्या दिशेने येणाऱ्या मंडळांची रांग लागली आहे. मिरजकर तिकटी येथून नंगिवली आणि पीटीएम ही दोन मंडळे मुख्य मार्गावर आल्यानंतर प्रतीक्षा करूनही मुख्य मिरवणुकीत प्रवेश मिळत नसल्याने देवल क्लबकडून येणाऱ्या मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी मिरवणूक रेंगाळू देऊ नका अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मिरवणूक रेंगाळल्याचे दाखवल्यानंतर पोलिसांनी मिरवणूक पुढे मार्गस्थ केली. तेव्हाच मिरजकर तिकटी येथून एका मंडळाने पुढे येण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा जमाव पांगवला.

- Advertisement -

दरम्यान इराणी खणीमध्ये दुपारी तीनपर्यंत 230 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुख्य मिरवणूक मार्ग महाद्वार रोडवर एक तासापेक्षा जास्त काळ थांबता येत नसल्याने मिरवणूक वेळेत पुढे सरकत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -