घरक्रीडाधावांचा पाऊस पाडणारा विराट 'सोशल'मध्येही आघाडीवर

धावांचा पाऊस पाडणारा विराट ‘सोशल’मध्येही आघाडीवर

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2022) स्पर्धेत विराटने ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्यामुळे ३३ वर्षीय विराट कोहलीने सोशल मीडियावरही (Social Media) आघाडी मिळवली आहे. ट्विटवर (Twitter) विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ५ कोटींच्या वर गेली आहे.

५ कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स (Followers On Social Media) असलेला विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. फेसबुकवर (Facebook) विराटचे ४९ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर या तिनही सोशल मीडियावर विराटचे एकूण ३१० मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -

विराट कोहलीनंतर सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) क्रमांक लागतो. सचिन तेंडुलकरच्या फॉलोअर्सची संख्या ३.७८ कोटी इतकी आहे. तसेच ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स विराट कोहली आणि सचिनचे सर्वाधिक आहेत. टॉप १०० मध्ये दोघांचाही क्रमांक लागतो.

भारतातील क्रिकेटपटूंसह राजकारणात पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ८.२४ कोटी आहे. तर पंतप्रधान कार्यालयाला ५.०५ कोटी लोक फॉलो करतात. परंतु क्रिकेट क्षेत्रात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या लोकांमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ICC महिला टी-20 क्रमवारी जाहीर; गोलंदाज रेणुका सिंह 13व्या, तर दीप्ती शर्मा 7व्या स्थानी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -