घरदेश-विदेशमस्कत विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला आग, प्रवासी सुखरूप

मस्कत विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला आग, प्रवासी सुखरूप

Subscribe

मस्कत  – मस्कत विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग लागली. विमानातून धूर निघत असताना विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानात 4 नवजात मुलांसह 145 प्रवासी तसेच वैमानिक व कर्मचारी होते. सर्व प्रवाशांना टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले आहे. हे विमान मस्कतहून कोचीला येत असताना ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

विमानाने उड्डाण घेण्याच्या काही क्षण आधी विमानातून धूर निघताना दिसला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने स्लाइडरच्या साह्याने विमानातील प्रवाशांना बाहेर काढले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की, रिलीफ फ्लाइट्सची व्यवस्था करण्यात येत असून प्रवाशांना दुसऱ्या प्लाइटने भारतात आणले जाईल. दोन महिन्यांपूर्वी कालिकतहून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून जळण्याचा वास येऊ लागल्याने ते मस्कतला वळवावे लागले होते.

हेही वाचा – प्रकल्प महाराष्ट्रातून निसटला कसा?, फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरेंचा संतप्त सवाल

- Advertisement -

विमानातील बिघाडाच्या दोन घटना

गेल्या 15 दिवसात अशा दोन घटना घडल्या असून ही तिसरी घटना आहे. 1 संप्टेंबरला दिल्लीहून नाशिककडे निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानातील ऑटो पायलटमध्ये बिघाड झाल्याने विमान अर्ध्यातून परतावे लागल्याची घटना घडली होती. याबाबत माहिती विमान वाहतूक नियामक DGCA ने दिली होती. दरम्यान या स्पाईसजेटच्या बोईंग 737 विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले होते.

तर, 5 सप्टेंबरला इंडिगोच्या सकाळच्या मुंबई फ्लाइट क्रमांक 6-E829 ने काही दिवसापूर्वी भोपाळहून मुंबईसाठी  सकाळी साडेअकरा वाजता उड्डाण केले होते. विमानात सुमारे 100 प्रवासी होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. विमान धावपट्टीवरच होते, त्यामुळे सुरक्षेसाठी ते परत आणण्यात आले. बिघाड दुरुस्त न झाल्याने प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले होते.

हेही वाचा – सुब्रमण्यम स्वामींना 6 आठवड्यात रिकामे करावे लागणार सरकारी निवासस्थान, दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -