घरमहाराष्ट्रप्रकल्प महाराष्ट्रातून निसटला कसा?, फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरेंचा संतप्त...

प्रकल्प महाराष्ट्रातून निसटला कसा?, फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Subscribe

वेदांता – फॉक्सकॉन कंपनीचा (Vedanta Foxconn) महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रकल्प गुजरातला गेल्याने संताप व्यक्त केला आहे. तब्बल 1.57 लाख कोटींचा हा प्रकल्प आहे. मात्र प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज ठाकरे यांनी एका ट्विटद्वारे राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं म्हणत आपली नाराजी उघड केली आहे.

राज ठाकरेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचं सरकार येऊन दोनचं महिने झाले. पण मागील दोन वर्षांत वेदांता फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद कदाचित मिळाला नसेल म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला असेल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

इतकचं नाही तर हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रयत्न केल्याचेही ते सांगायला विसरले नाही. या प्रकल्पासाठी कंपनीला पुण्यातील तळेगाव इथं जागा देण्यात आली होती. तसेच वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या चेअरमनसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीतून कंपनीला 30-35 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. यात काही सबसिडींचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. मुंबई घेण्यात आलेल्या शिंदे गटाच्या पदााधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.


घरवापसी झालेल्या रमेश पवारांकडे पुन्हा मुंबई मनपा सहआयुक्त पदाचा भार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -