घरदेश-विदेशलतादीदींच्या स्मरणार्थ अयोध्येमध्ये स्थापन केली 40 फूट उंचीची वीणा; पंतप्रधानांच्या हस्ते होणार...

लतादीदींच्या स्मरणार्थ अयोध्येमध्ये स्थापन केली 40 फूट उंचीची वीणा; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्धाटन

Subscribe

आज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा 93 वा जन्म दिवस असल्यामुळे अयोध्येतील राम कथा पार्कामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

आज भारतातील सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची 93वी जयंती आहे. त्यांच्या मृत्यूनंतरचा हा पहिला जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये एका प्रमुख चौकामध्ये 14
टन वजनाची आणि 40 फुट उंचीची वीणा स्थापन करण्यात आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन करण्यात येईल.तसेच यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

आज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा 93 वा जन्म दिवस असल्यामुळे अयोध्येतील राम कथा पार्कामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यामध्ये लता मंगेशकरांच्या आयुष्यावरील आधारित ध्वनीचित्रफीत दाखवण्यात येईल. याचं निमित्ताने महान संत महंत आणि जनप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी ट्वीट केलंय की, “लता दीदीच्या जयंती निमित्त त्यांनी नमन. असं खूप काही आहे. जे मला आठवतंय. अगणित गप्पा ज्यामध्ये त्यांनी खूप प्रेम दाखवलं. मला आनंद आहे की आज अयोध्येमध्ये एक चौकाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवलं जात आहे. भारतातील एका महान, आदर्श व्यक्तिला भावपूर्ण श्रद्धांजली.”

- Advertisement -

1929 मध्ये झाला होता जन्म
लता मंगेशकर यांचा 1929 मध्ये जन्म झाला होता. आज त्यांचा 93 वा वाढदिवस आहे. मृत्यूनंतरचा त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -