घरमहाराष्ट्रपीएफआयवर ट्विटरचीही मोठी कारवाई; संघटनेसह पदाधिकाऱ्यांचे ट्विटर हँडल बंद

पीएफआयवर ट्विटरचीही मोठी कारवाई; संघटनेसह पदाधिकाऱ्यांचे ट्विटर हँडल बंद

Subscribe

केंद्र सरकारने देशविरोधी कारवायांचा आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसह त्यांच्याशी संबंधित इतर आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली. यानंतर आता ट्विटरनेही या संघटनेविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. पीएफआयच्या अधिकृत हँडलसह काही पदाधिकाऱ्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.

ट्विटरने कारवाई केलेल्या पीएफआयचे पदाधिकाऱ्यांमध्ये पीएफआयचा प्रमुख ओमा सलाम आणि सरचिटणीस अनिस अहमद यांचा समावेश आहे. दोघांनाही एनआयएने छापेमारीनंतर अटक केली आहे. संबंधित ट्विटर हँडलबाबत कायदेशीर बंदीची मागणी झाल्यानंतर ट्विटरने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पीएफआय आणि त्यासंबंधीत सर्व ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

यासह केंद्र सरकारनेही पीएफआयच्या वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात पीएफआयसंबंधीत आठ इतर संघटनांच्या वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाऊंटचा समावेश आहे.

पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयए. ईडीने दुसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. या तपास यंत्रणांनी आतापर्यंत महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकसह आठहून अधिक राज्यांत छापेमारी केली, या छापेमारीत पीएफआय संबंधीत 250 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून अनेक कागदपत्रेही गोळा केली आहेत. दरम्यान पीएफआयवरील कारवाई विरोधात केरळमध्ये मोठ्या हिंसाचाराची घटना समोर आली. तर अनेक भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकरणी देखील केरळमध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान अद्यापही केंद्रीय तपास यंत्रणा पीएफआयसंबंधीत अनेक संघटना, कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. यात  दहशतवादी संघटना आएसआय आणि आखाती देशांसोबत पीएफआयतचे थेट संबंध जोडले गेले आहेत.त्यामुळे पीएफआयच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय जाळे समोर आले आहे.


अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ऐकलंत का? शंकर महादेवन यांनी दिलीय साथ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -