घरमनोरंजनअमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ऐकलंत का? शंकर महादेवन यांनी दिलीय साथ

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ऐकलंत का? शंकर महादेवन यांनी दिलीय साथ

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. यात आता त्या एक गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यांची अनेक गाणी आणि अल्बम प्रदर्शित झाले आहेत. ज्याची मोठी चर्चा रंगली. सोशल मीडियावरही त्यांच्या गाण्यांवर चांगल्या -वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट्स येत असतात. अशात अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवं गाणं रिलीज झाल आहे. सुप्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्यासोबत त्यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. महाराष्ट्रातील समृद्ध पर्यटनाची माहिती देणारं हे गाणं आहे.

27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिनानिमित्त हे खास गीत प्रदर्शित करण्यात आलं. शंकर महादेवन यांच्यासोबत महाराष्ट्राचं पर्यटन गीत मिसेस फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकूणचं महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचं महत्त्व जगापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. 27 सप्टेंबर 2022 महाराष्ट्र पर्यटन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथे आयोजित एका कार्यक्रमात हे गाणं महाराष्ट्राला समर्पित करण्यात आले.

- Advertisement -

महाराष्ट्र हा औद्योगिक प्रांत म्हणून ओळखला जातो. मात्र पर्यटन व्यवसायातही राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस हे कलाकार महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्र समृद्ध करण्याच्या या मोहिमेत सहभागी झालेत आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत या नव्या गाण्यासंदर्भात माहिती दिली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत लिहिले की, चला महाराष्ट्राला बनवूया नंबर एक , USPs आहेत ह्या राज्याच्या अनेक, आता नको कामात कसला ही break , प्रगतीला आला आता पूर्णपणो वेग !. यासोबत त्यांनी महाराष्ट्र पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षक आमि त्यांचे चाहतेही कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.


मुलाच्या सुरक्षेसाठी आईचा भन्नाट जुगाड; व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंकांनीही केलं कौतुक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -