घरमहाराष्ट्रगोव्यावरून दारू आणणाऱ्यांची आता खैर नाही! शिंदे सरकार दाखल करणार मकोकाअंतर्गत गुन्हा

गोव्यावरून दारू आणणाऱ्यांची आता खैर नाही! शिंदे सरकार दाखल करणार मकोकाअंतर्गत गुन्हा

Subscribe

गोव्याला मज्जामस्तीसाठी जात येताना अनेक मद्यप्रेमी छुप्या पद्धतीने राज्यात दारूच्या बाटल्या घेऊन येत असतात. गोव्यात दारूवर टॅक्स कमी असल्याने राज्यात मोठ्याप्रमाणात दारूची तस्करी केली जाते. यामुळे शिंदे फडणवीस सरकराने या मद्यपींना चांगलाच दणका देण्याची योजना आखली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी एक आदेश काढला असून ज्यात गोव्यावरून विनापरवाना दारू आणणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे गोव्यात जाऊन तुम्ही देखील दारू आणण्याचा प्लॅन करत असाल तर आता जरा सावधचं रहा.

मंत्री शंभूराज देसाई यांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना दिल्या असून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. गोव्यावरून अनेक मद्यप्रेमी स्वत: दारू आणून ती बेकायदेशीरपणे राज्यात विक्री करतात. याचा परिणार राज्याच्या महसुलावर होत असतो. यामुळे राज्य सरकारने तोडगा काढण्यासाठी हा आदेश जारी केला आहे. यात काही नागरिक गोव्यातील मद्याच्या दुकानातून परवाना घेऊन राज्यात दारूचा साठा आणतात. मात्र मंत्री शंभूराजे देसाई यांनी गोव्यात अशाप्रकारे परवाना देण्याचा काही अधिकार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

- Advertisement -

याबाबत आयुक्तांनाही सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशी पद्धतीचा गुन्हा घडत असेल तर त्या व्यक्तीविरोधात मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गोव्या राज्याला त्यांच्या राज्यात मद्यविक्रीसाछी परमिट देण्याचा अधिकार आहे, मात्र महाराष्ट्रात अशाप्रकारे परवाना देण्याचा कोणताही अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने गोव्यावरून होणारी दारू तस्करी थांबवण्यासाठी गोवा आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या अनेक छोट्या आणि मोठ्या रस्त्यांवर चेक पॉइंट्स उभारण्याचेही आदेश दिले आहेत. कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या माहितीनुसार, गोव्याहून येणाऱ्या ज्या रस्त्यांवर तपासणी होत नाही त्या ठिकाणी देखील आता चेक पॉइंट बांधले जाणार आहेत. यात वारंवार गुन्हा करणाऱ्यांविरोधात मकोका कलम 93 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान, मुंबई महापालिका निवडणुकीचा ट्रेलर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -