घरताज्या घडामोडीअंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा; काँग्रेसची भूमिका अस्पष्ट

अंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा; काँग्रेसची भूमिका अस्पष्ट

Subscribe

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीचं मतदान येत्या ३ नोव्हेंबरला होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. शिवसेनेकडून अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नीला तिकीट दिलं जाणार आहे. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अंधेरी पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पवार म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. परंतु काँग्रेस पाठिंबा देणार कि नाही?, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी ही पहिली पोटनिवडणूक होणार आहे. परंतु धनुष्यबाण कोणाला मिळणार? याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. आयोगाची लढाई पूर्णपणे सुरूही झालेली नाही. केवळ एका गटाने कागदपत्रं दाखल केली आहेत. तर ठाकरे गटाने अद्यापही आपली कागदपत्रं दाखल केलेली नाहीयेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोग धनुष्यबाणाचं चिन्हं कुणाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने निवडणूक लढवल्यास हे चिन्हं शिंदे गटाला मिळणार की शिवसेनेला याचीही उत्सुकता लागली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात भाजप नेते आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट केलं होतं.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार श्री. मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचे यावेळी दिसले.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा आहे. त्यामुळे यामध्ये अन्य भाषण करण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.


हेही वाचा : दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका, शरद पवारांचा सल्ला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -